Vaibhav Khedekar : हकालपट्टी केलेला मनसे नेता गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत गेला, मात्र भाजप प्रवेशाला दुसऱ्यांदा ब्रेक

Khed Politics : तळ कोकणात पुन्हा एकदा चर्चेंना उधान आले असून खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरांसह सुमारे 350 जणांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा रखडला आहे.
Vaibhav Khedekar
Vaibhav Khedekar Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  • खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला.

  • खेडेकरांसोबत सुमारे 350 समर्थक भाजपमध्ये प्रवेश करण्यास सज्ज होते.

  • या विलंबामुळे स्थानिक राजकारणात चर्चा व अनिश्चितता वाढली आहे.

Ratnagiri News : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात मोठी कारवाई पक्षाने केली. पक्षाने थेट खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली. यामुळे ऐन स्थानिकच्या तोंडावर कोकणातील मनसेत खळबळ उडाली होती. तर या संधीचे सोनं करण्यासाठी भाजपने डाव टाकत त्यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. मात्र त्यांचा दुसऱ्यांदा भाजप प्रवेश रखडल्याने कोकणातील राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

आपल्या मराठी भाषेत 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' अशी म्हण आहे. वैभव खेडेकरांसाठी सध्या ही म्हण लागू पडताना दिसत आहे. खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ केल्यानंतर त्यांनी थेट नाराजी व्यक्त भाजप प्रवेशाची घोषणा केली. पण त्यांच्यांसह जवळपास 350 जणांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा रखडला. दुसऱ्यांदा खेडेकर यांचा भाजप प्रवेशवर पडल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या वेळी याच महिन्याच्या 4 तारखेला त्यांचा भाजप प्रवेश होईल अशी घोषणा खूद्द भाजप मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली होती. मात्र त्यावेळी खासदार नारायण राणे यांच्या प्रकृती बिघाडाच्या कारणामुळे हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवस आधी खेडेकर यांना भाजप पक्षप्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आणि मुंबईला बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत भाजपकडून कोणतीच अधिकृत घोषणा झाली नव्हती.

Vaibhav Khedekar
Vaibhav Khedekar : खेडमध्ये मोठी राजकीय घडामोड! खेडेकरांचा रखडलेला भाजपत प्रवेश उद्याच होणार?

यावेळी खेडेकर 25 ऑगस्टला शेकडो कार्यकर्त्यांसह गाड्यांच्या ताथ्यांसह खेड येथून मुंबईला रवाना झाले होते. त्यावेळी त्यांनी, आपण भाजपचं काम यापूर्वी सुरु केल्याचं म्हटलं होतं. आता फक्त पक्ष प्रवेशाची औपचारिकता आहे, म्हणून आपण मुंबईकडे निघालो असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र ज्यावेळी खेडेकरांसह त्यांचे कार्यकर्ते मुंबईतील भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात पोहचले त्यावेळी एकही नेता उपस्थित नव्हता. पक्षप्रवेशाची कोणतीही तयारी नव्हती, यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे समोर आले होते.

दरम्यान खेडेकर यांचा पक्षप्रवेश पुन्हा हुकल्याने विविध राजकीय चर्चा तर्कवितर्क लावले जात असतानाच त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत दुसरी माहिती समोर येत आहे. खेडेकर यांनी डोंबिवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्यासह प्रवेश करणाऱ्यांची सविस्तर माहिती दिली होती. तसेच आगामी स्थानिकबाबतही चर्चा केली होती.

खेडेकर यांच व्हॉट्सअप स्टेटस...

दुसऱ्यांदा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हुकल्यानंतर आता खेडेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 'तुमच्या जिद्दीसमोर चक्रव्यूह सुद्धा फिका पडेल, राजकारणात थोडा उशीर झाला तरी जनतेचे प्रेम कायम तुमच्या पाठीशी राहील' आमचे राजकीय अस्तित्व संपवणे इतके सोपे नाही, तुमच्याकडे पैसा असेल पण बुद्धी आम्हाला खानदानी देणगी आहे, जो धाडस करतो त्यालाच यश मिळतं, असे त्यांनी ठेवलेल्या स्टेटसची सध्या चर्चा रंगली आहे.

Vaibhav Khedekar
Vaibhav Khedekar : खेडेकरांचा भाजपप्रवेश रखडला? कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

FAQs :

प्र.१: भाजप प्रवेश कोणाचा रखडला आहे?
उ. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश रखडला आहे.

प्र.२: त्यांच्यासोबत किती जण भाजपमध्ये प्रवेश करणार होते?
उ. अंदाजे 350 समर्थक खेडेकरांसोबत भाजपमध्ये जाणार होते.

प्र.३: प्रवेश का रखडला?
उ. पक्षाच्या अंतर्गत कारणांमुळे व नियोजनाच्या दृष्टीने प्रवेश पुढे ढकलण्यात आला.

प्र.४: या विलंबाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उ. स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण येईल व कार्यकर्त्यांची नाराजी वाढू शकते.

प्र.५: प्रवेशाची नवी तारीख ठरली आहे का?
उ. सध्या अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com