Vaibhav Naik Sarkarnama
कोकण

Vaibhav Naik : वैभव नाईकांच्या अडचणी संपेनात, ACB नंतर आता PWD सक्रीय!

Vaibhav Naik : आपण कधीच ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही, असे नाईक यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामा ब्यूरो

Vaibhav Naik : शिवसेना ठाकरे गटातील वैभव नाईक यांच्या मालमत्तेची मोजमापं घेण्यात याव्यात, असा आदेश राज्याच्या एसीबीने (ACB) दिले आहे. यानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.कणकवली येथे आमदार वैभव नाईकांच्या राहत्या घरी त्यांच्या मालमत्तेची मोजमाप करण्यात आले. यावर नाईक यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

वैभव नाईक म्हणाले, "माझ्यावर होणाऱ्या या सर्व कारवाया कुणाच्या दबावतंत्राखाली होत आहेत. याबद्दल लोकांना सर्व माहिती आहे. मात्र या दबावतंत्राला घाबरून आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही."

वैभव नाईक यांच्यावर होणाऱ्या एसीबीच्या कारवाईत नवे वळण आले आहे. यापूर्वी नाईक यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्यात अॅन्टी करप्शन ब्युरोकडून चौकशी करण्यात करण्यात येत होती. आता नाईक यांचे कणकवली स्थित घर, शिरवल भागातील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज, क्रशर, हळवल भागातील पाईपचा कारखाना या सर्व ठिकाणी स्थित असलेल्या बांधकामाची तत्कालीन दरानुसार मूल्य काढून रिपोर्ट सादर करण्यात यावे असा आदेशच अॅन्टी करप्शन ब्युरोने बांधकाम विभागाला दिले. कणकवलीत नाईक यांच्या मालमत्तेची मोजमापं घेण्याचे कार्य़वाहीला सुरुवात करण्यात आले आहे.

दरम्यान यावर बोलताना नाईक म्हणाले , कसाही दबावतंत्राचा माझ्यावर दबावतंत्राचा वापर करण्यात आला तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही,आपली वडिलोपार्जित जमीन आहे. माझ्याच मालकीच्या जागेत मी घर बांधलंय. माझ्या व्यवसायात मी कुठेही लपवाछपवी केलेली नाही.माझे व्यवहार समोर आहेत. यामुळे कसल्याही कारवाईला मी कधीच घाबरणार नाही. आपण कधीच ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही, असे नाईक यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT