Nitesh Rane, Vaibhav Naik
Nitesh Rane, Vaibhav Naik sarkarnama
कोकण

नितेश राणेंच्या टीकेला वैभव नाईक यांचे कृतीतून उत्तर...

सरकारनामा ब्युरो

कणकवली : सिंधुदुर्गात शिवसेना नेत्यांनी पोलिस संरक्षणाशिवाय फिरून दाखवावे, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले होते. या आव्हानाला वैभव नाईक यांनी कृतीतून उत्तर दिले. त्यांनी आज कणकवली शहरातून विना पोलिस संरक्षण फेरफटका मारला. याबाबत श्री. नाईक यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमधील संघर्ष पेटला आहे. यातूनच एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत दोन्ही बाजूंच्या नेत्यांची मजल गेली आहे. भाजपचे माजी खासदर किरिट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्योरोप सुरू आहेत.

यातून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी किरीट सोमय्या यांच्या कारवर मुंबईत हल्ला झाल्यानंतर पोलिसांना २४ तासासाठी रजेवर पाठवा, मग बघा कशी परिस्थिती आटोक्यात आणतो, असे आव्हान देतानाच मला राज्य सरकारकडून अधिकृत पोलिस संरक्षण देण्यात आलेले नाही. मला उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे संरक्षणही नकोय. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी पोलिस संरक्षणाशिवाय फिरून दाखवावे, थेट आव्हान सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या नेत्यांना दिले होते.

नितेश राणे यांच्या आव्हानानंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आमदार वैभव नाईक कणकवली शहरातून पोलिस संरक्षणाशिवाय फेरफटका मारत असल्याचे दिसत आहे. मुळात आमदार वैभव नाईक हे दररोज सकाळी कणकवली शहरात फेरफटका मारतात.

नाष्टा असो, सायकलींग असो किंवा व्यायासामसाठी असो..दररोज सकाळी ते पोलिस संरक्षणाशिवाय जात असतात. आज त्यांचा व्हायरल झालेल्या व्हिडीओतून नितेश राणे यांच्या टीकेला वैभव नाईक यांनी कृतीतून उत्तर दिल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे आता पोलिस संरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप व शिवसेनेत पुन्हा कलगीतूर रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT