मोठी घडामोड : नितेश राणेंचा स्वीय सहाय्यक कणकवली पोलिसांसमोर शरण

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर 24 तासांतच राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी नियमित जामिसाठी अर्ज केला असून, त्यांना जामीन मिळणार की अटक होणार याचा फैसला आज होणार आहे. दरम्यान, त्यांचे स्वीय सहाय्यक कणकवली पोलिसांसमोर शरण आले आहेत.

नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे आज सकाळी कणकवली पोलिसांसमोर शरण आले. संतोष परब हल्ला प्रकरणात राकेश परब हे आरोपी आहेत. या प्रकरणी सचिन सातपुते याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. सातपुते यानेच संतोष परबवर हल्ला केला होता. .या सातपुतेच्या संपर्कात नितेश राणे सातत्याने होते, असा पोलिसांचा आरोप आहे. राणे हे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्याच माध्यमातून सातपुतेशी संपर्क साधत होते, असाही पोलिसांचा दावा आहे. आता राकेश परब हे पोलिसांसमोर हजर झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) हे सुद्धा होते. नितेश राणे वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. राणेंच्या जामिनावर वकिलांनी बाजू मांडली असून, पुढील सुनावणी आज होणार आहे. (Nitesh Rane News)

Nitesh Rane
भय्यू महाराजांच्या शिष्येसह सेवादार तीनच वर्षांत तुरुंगातून सुटणार कारण...

राणे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांचा कालावधी दिला होता. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. (Nitesh Rane News Updates)

Nitesh Rane
परमबीरसिंहांचा पाय खोलात; खंडणी उकळण्यासाठी 'छोटा शकील'चा वापर

उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायाललयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले. आता त्यांना अटक होणार की जामीन याचा फैसला सत्र न्यायालय घेणार आहे. (Nitesh Rane bail hearing)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com