Mumbai, 16 May : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजेत की विनायक राऊत हे एकदा ठरवावं. कारण, तीन आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरे परदेशात जाण्याच्या अगोदर माजी आमदार वैभव नाईक हे माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात एक शिष्टमंडळ घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते. विनायक राऊत आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात नको, अशी मागणी त्यांनी ठाकरेंकडे केली आहे, त्याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे.
माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यात मतभेद असल्याचा मुद्दा मंत्री नीतेश राणे यांनी मांडला आहे. त्यातून शिवसेनेत अंतर्गत मतभेद तीव्र स्वरूपाचे असल्याचे राणे यांनी दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
नीतेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, सिंधुदुर्गच्या शिवसेनेचा आका कोण? हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी अगोदर ठरवावं. विनायक राऊतांचं पार्सल आम्ही मुंबईला परत पाठवून देतो, हे सांगताना वैभव नाईक कुठे काय काय बोलत होते, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गचा आका कोण?, ही आमच्यावर शोध मोहिम सुरू करण्याअगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजेत की विनायक राऊत पाहिजेत हे एकदा ठरवावं.
उद्धव ठाकरे परदेशात जाण्याच्या अगोदर तीन आठवड्यांपूर्वी वैभव नाईक हे एक शिष्टमंडळ घेऊन मातोश्रीवर गेले होते. विनायक राऊत आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात नको, अशी मागणी करण्यासाठी ते ठाकरेंकडे गेले होते. हे खरं की खोटं आहे, ते सांगा. त्यांच्यासोबत गेलेला एक व्यक्ती मी समोर आणतो, तो याबाबतचे पुरावे देईल. आमच्याकडे बोट दाखवत सिंधुदुर्गचा आका कोण, हे शोधण्यापेक्षा तुमच्या ‘उबाठा’चा आका कोण, हे पाहिल्यांदा सांगावे, असे आव्हानही नीतेश राणे यांनी दिले.
संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात काही पानं लिहियची राहिली असतील. कारण, त्यांनी कारागृहात असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबीयांना ज्या शिव्या दिल्या आहेत. त्याचा उल्लेख त्या पुस्तकात करायचे विसरलेले आहेत. जेलमध्ये असताना दुसऱ्यांसमारे उद्धव ठाकरेंची जी लायकी ते काढायचे, त्याचा उल्लेख संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात करावा. नुसतंच तुमचं प्रेम बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर दाखवता. अपूर्ण पुस्तक लिहू नये, पूर्ण पुस्तक काढा, म्हणजे त्यांना नरकात पाठविण्याचे काम उद्धव ठाकरेच करतील, असा दावाही राणेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.