Maharashtra Politic's : ईडीची छापेमारी होताच संजय राऊतांनी केला थेट अमित शाहांना फोन; शाह यांच्यानंतर शेलारांचा कॉल, नेमकं त्यावेळी काय घडलं?

Sanjay Raut : माझ्या बरोबरच्या लोकांवर तुम्ही छापेमारी करता. त्यांना त्रास देता, त्यांच्यावर दहशत निर्माण करता. मी टार्गेट आहे ना? मी टार्गेट आहे आणि दिल्लीत तुमच्या घरासमोरच माझं घर आहे.
Ashish shelar-Amit Shah-Sanjay Raut
Ashish shelar-Amit Shah-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 16 May : महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांवर वारंवार छापेमारी करण्यात येत होती. विशेषतः शिवसेना नेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत होती, त्या वेळी खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच फोन लावला हेाता. त्याबाबत खुद्द राऊतांनीच भाष्य केले आहे. ‘मी माझ्या स्वभावानुसार हिम्मत असेल तर मला अटक करा असे मी त्यांना सांगितले होते,’ असेही राऊतांनी नमूद केले. त्यानंतर शाह यांनी आशिष शेलारांना राऊतांना फोन करण्याची सूचना केल्याचीही आठवण त्यांनी सांगितली.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन उद्या ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्स विभागाकडून झालेल्या कारवाईच्या संदर्भाने भाष्य केले आहे.

ते म्हणाले, मी अमित शाह (Amit Shah) यांना माझ्या स्वभानुसार बोललो. हिम्मत असेल तर मला अटक करा. माझ्या बरोबरच्या लोकांवर तुम्ही छापेमारी करता. त्यांना त्रास देता, त्यांच्यावर दहशत निर्माण करता. मी टार्गेट आहे ना? मी टार्गेट आहे आणि दिल्लीत तुमच्या घरासमोरच माझं घर आहे. ते कृष्ण मेनन रोडला राहतात, मी सफदरजंग लेननला राहतो. आम्ही समोरासमोरच राहतो.

Ashish shelar-Amit Shah-Sanjay Raut
Solapur Politic's : काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील : जयकुमार गोरेंच्या टप्प्यात कोण?

मी इथेच बसलो आहे, मला अटक करा?, असे मी त्यांना म्हटलं. तुम्ही किरकोळ लोकांना जाऊन त्रास देताय?, ही कसली मर्दांनगी?, असे मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना म्हटलं होतं, अशी आठवणही संजय राऊत यांनी सांगितली.

माझ्या मुलाच्या लग्नातील कॉन्ट्रक्टरलाही मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला. मला अटक करा आणि थेट कारवाई करावी. मी तुमच्या अटकेसाठी दिल्लीत उपलब्ध आहे. मला अटक करा, असं आव्हान मी अमित शाह यांना दिले होते. मी काय घाबरतोय का? असेही राऊतांनी म्हटले आहे.

Ashish shelar-Amit Shah-Sanjay Raut
Dr. Shirish Valsangkar : मनीषा मुसळे-माने धमकी देऊन खात्यावर पैसे भरायला लावायची; साक्षीदारांनी कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा

अमित शाह आणि संजय राऊत यांचा फोन झाल्यानंतर, आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना फोन आला होता. त्यावर राऊत म्हणाले, अमित शाह यांनी आशिष शेलार यांना फोन केला होता. त्यांनी माझे काय म्हणणे आहे, ते जाणून घ्यायला सांगितले होते. माझे काय म्हणणे आहे, हे अमित शाह यांना माहिती आहे, त्यांच्याशिवाय ही छापेमारी सुरू आहे का, असे मी शेलारांना सांगितल्याचे राऊतांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com