Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
कोकण

महाराष्ट्रात विरोधी पक्ष आहे तरी कुठे? : भाजप नेत्याचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष महाराष्ट्र बंद करण्याची हाक देत आहेत. मात्र, राज्यात विरोधी पक्ष आहे तरी कुठे? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सावंतवाडीत केला. कर्नाटक सरकारने कितीही मागणी केली, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असताना एक इंचही जमीन कर्नाटकात जाणार नाही याची खात्री देतो, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (Where is the opposition party in Maharashtra? : Chandrashekhar Bawankule)

सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वरील विधान केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर, संजू परब, मनोज नाईक, आनंद नेवगी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आसाम-गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना खासदार संजय राऊत यांनी ४० रेडे गुवाहाटीला गेल्याचे म्हटले होते. पण, आमदारांना रेडे म्हणणे योग्य नाही. राज्यपालांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष महाराष्ट्र बंदची हाक देत आहेत. मात्र राज्यात विरोधी पक्ष आहे तरी कुठे?

राज्यातील सरकार आज जाईल, उद्या जाईल असे म्हटले जाते. मात्र, राज्यात विरोधी पक्षच नाही आणि आहेत ते आपले आमदार टिकवण्यासाठी अशी वक्तव्ये करून त्यांचे वळवण्याचा प्रयत्न करतात. उद्धव ठाकरेंकडून आता आमदार बाजूला जायला लागले आहेत. भविष्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचेही आमदार जातील. महाराष्ट्रात २६/११ हा शहीद दिन म्हणून पाळला जातो. या दिवशीच मुख्यमंत्री शिंदे ४० आमदारांसह आसाम-गुवाहाटीला गेल्यामुळे सर्व थरातून टीका होत असली तरी शहीद दिनाचे कार्यक्रम पूर्ण करूनच मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले आहेत. कदाचित भ्रष्टाचारी, अनाचारी व दुराचारी सरकार सत्तेवरून गेल्यामुळे आई कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी ते गेले असतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले. आपण हिंदू धर्मिय असून देवावर श्रध्दा ठेवणारे असल्याचेही बावनकुळे यांनी सांगत बाळासाहेबांची शिवसेनेच्या गुवाहाटीच्या दौऱ्याचे समर्थन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT