महाराष्ट्राचा अपमान यापुढे सहन करणार नाही : चंद्रशेखर बावनकुळेंनी खडसावले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बुद्धिभ्रंश झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांना वारंवार लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा बुद्धिभ्रंश झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीवरून डॉक्टर पाठवायला पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. (Chandrashekhar Bawankule's criticism of Rahul Gandhi)

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रत्नागिरी दौऱ्यात असताना स्वातंत्रवीर सावरकर यांना स्थानबद्ध करण्यात आलेल्या रत्नागिरी येथील विशेष कारागृहातील स्मारक, कोठडी व सावरकरांनी अस्पृश्य प्रत्येक बांधवांना देवाची पूजा आणि मूर्तीला स्पर्श करण्यासाठी बांधलेल्या पतित पावन मंदिराला भेट दिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Chandrashekhar Bawankule
राज ठाकरे घेणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार?

राहुल गांधी यांची स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का, असाही टोला त्यांनी लगावला. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर राहुल गांधी यांना राज्यातून हाकलून लावले असते, परंतु त्यांचे नातू गळाभेट घेत आहेत. राहुल गांधी यांनी ही कोठडी बघावी, साखळदंड, बेड्या बघाव्यात. सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके बघावीत. आज मी हे सारे बघितले, भावना अनावर झाल्या. या भूमीचा, महाराष्ट्राचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना दिला.

Chandrashekhar Bawankule
हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात दिल्ली कोर्टाचे अटक वॉरंट; पण दिल्ली पोलिस...

या वेळी त्यांच्यासोबत भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, पतितपावन मंदिर संस्थेचे ॲड. बाबा परुळेकर, शहराध्यक्ष सचिन करमकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com