Ratnagiri Sangameshwar News : Sarkarnama
कोकण

Ratnagiri Sangameshwar News: उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा शिलेदार कोण? आज ठरणार उमेदवारी?

Uday Samant News : "त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची आतापासूनच तयारी सुरू आहे. "

सरकारनामा ब्यूरो

Kokan News : कोकणातील रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत आज शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत (Uday Samnat) यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची, याची चर्चा आजच्या ठाकरे गटाच्या बैठकीत होणार आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र यावेळी गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) मतदारसंघातच आहेत. (Latest Marathi News)

राजन साळवी यांची हजेरी तर भास्कर जाधव यांची अनुपस्थिती याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहेत. दुसरीकडे उदय बने तसेच प्रदीप उर्फ बंडा साळवी व राजन साळवी या तीन नावांची ठाकरे गटाकडून चर्चा होत होती. यापैकी राजन साळवी आणि बंडा साळवी हे दोन्ही नेते मातोश्रीवर अपेक्षेप्रमाणे उपस्थित राहिले आहेत.

रत्नागिरी संगमेश्वर हा उदय सामंत यांचा मतदारसंघ आहे. निवडणुकाला जवळपास वर्षभराचा काळ राहिला आहे. त्यामुळे सामंतांच्या विरोधात मजबूत उमेदवार द्यावा, अशी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची आतापासूनच तयारी सुरू आहे. आजच्या बैठकीनंतर याबाबत अधिक तपशील मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT