Sharad Pawar News : पक्षवाढीसाठी स्वतः शरद पवारांनी घातले लक्ष!

शरद पवार यांनी नाशिकच्या विविध कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
Sharad Pawar With Gokul Pingle & Others
Sharad Pawar With Gokul Pingle & OthersSarkarnama
Published on
Updated on

NCP Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नाशिकहून ठराविक पदाधिकाऱ्यांना बोलावून लोकांच्या मनातलं जाणून घेण्याबरोबरच पक्षात काम करण्याची संधी मिळालेल्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना कामाला लागा, शहरावर लक्ष ठेवा, असे आवाहन करीत संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Sharad Pawar meet Nashik`s various newly joined followers)

माझे नाशिककडे (Nashik) विशेष लक्ष आहे, पदाधिकाऱ्यांनी विशेष करून शहरावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला आहे.

Sharad Pawar With Gokul Pingle & Others
Sadabhau Khot विरुद्ध NCP नेत्यांमध्ये जुंपली, दोन्ही बाजूने शाब्दिक चकमक | Sharad Pawar | Sarkarnam

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार व अजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार यांनी मीच पक्षाचा आश्वासक चेहरा असल्याचे जाहीर केले. ते आता जनतेच्या दरबारात जात असून, त्याची सुरवात त्यांनी नाशिकपासून केली.

नाशिकच्या विविध पदाधिकारी तसेच युवकांनी गेल्या दोन दिवसांत मुंबईक सिल्वर ओक येथे त्यांच्याशी संपर्क केला. नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार पवार यांच्या बैठका तसेच येवला येथील सभेला मोठी गर्दी झाली. सभागृह खचाखच भरण्याबरोबरच बाहेरदेखील गर्दी ओसंडून वाहत होती. त्यामुळे पवार यांच्या भूमिकेला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

Sharad Pawar With Gokul Pingle & Others
Ramdas Athawale : शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही भाजप सरकारमध्ये यावे!

नाशिकमधील कार्यक्रम आटोपून पवार येवला येथे रवाना झाले. द्वारका येथे नागरिकांनी वाहने थांबून पवार यांची स्वागत केले. त्यानंतर पुढे जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले. नांदूर नाका, चांदोरी, सायखेडा, निफाड, लासलगाव, विंचूर येथेही त्यांचे जोरदार स्वागत झाले. येवला येथे त्यांची जोरदार सभा झाल्यानंतर नाशिकला येऊन रविवारी ते मुंबईत पोचले.

नाशिकमध्ये पुढील रणनीती आखण्यासाठी त्यांनी काही निवडक कार्यकर्त्यांना बोलवून घेतले होते. यामध्ये माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, लक्ष्मण मंडाले, दत्तात्रय माळोदे, सिद्धांत मंडाले यांचा समावेश होता. श्री. पिंगळे यांच्याशी चर्चा करताना नाशिक शहर व जिल्ह्याचा आढावा त्यांनी घेतला. मतदारांचा कल जाणून घेताना नाशिक शहरामध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Sharad Pawar With Gokul Pingle & Others
Sadabhau Khot विरुद्ध NCP नेत्यांमध्ये जुंपली, दोन्ही बाजूने शाब्दिक चकमक | Sharad Pawar | Sarkarnam

गजानन शेलार यांनी केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. शेलार यांच्यासोबतच विशिष्ट पदाधिकाऱ्यांना संघटना बांधणीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. युवावर्गाच्या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती श्री. पिंगळे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com