Ratnagiri politics; Uday Samant, MP Sunil Tatkare, Yogesh Kadam, MLA Shekhar Nikam, MLA Kiran Samant, MLA Pramod Jathar, MLA Aniket Tatkare, and Zilla Parishad President Asmita 
कोकण

Sunil Tatkare News : नजरा चुकविल्या, बोलणेही टाळले, पण बैठकीच्या आधी कदम-तटकरेंची एकाच खोलीत चर्चा? उदय सामंत, राणेंसह प्रमुख नेतेही उपस्थित

Ratnagiri Political Drama News : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने रत्नागिरी शासकीय विश्रामगृहाबाहेर वेगळाच राजकीय ड्रामा पाहायला मिळाला.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळी नजरा चुकवत, बोलणेही टाळत शिवसेनेचे नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे निघून गेले. या राजकीय ड्रामा आणि ‘कोल्ड वॉर’ची राजकीय चर्चा जोरदार चर्चा रंगली असतानाच आता बैठकीच्या आधीचा एक फोटो समोर आला आहे.

बैठकीनिमित्त रत्नागिरीत आलेले सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी एकाच खोलीत चर्चा करताना दिसत आहेत. ज्यात कदम आणि तटकरे देखील आहेत. यामुळे एकाच खोलीत चर्चा करणारे बैठकीनंतर असे का गेले असाही सवाल आता अनेकांना पडला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त रत्नागिरीत राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, आमदार अनिकेत तटकरे एकत्र आले होते.

यावेळी शासकीय विश्रामगृहावर या सर्व प्रमुख नेत्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे देखील उपस्थित होत्या.

या भेटीदरम्यान राज्य आणि जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर सविस्तर चर्चेसह जिल्हा नियोजन बैठकवर चर्चा करण्यात आली. तसेच एकीकडे फक्त जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केले आहेत. पण प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासह प्रशासनाने कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे यावर राणे यांनी मार्गदर्शन केल्याचे कळते.

दरम्यान या बैठकीनंतर झालेल्या राजकीय ड्रामा आणि‘कोल्ड वॉर’चीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे बैठकीनंतर समोरासमोर आले. मात्र या दोघांनीही एकमेकांकडे पाहणे पसंत न करता सोयीस्करपणे नजरा चुकवत पाठ फिरवून निघून गेले. या ‘कोल्ड वॉर’ मागे माजी मंत्री रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील जुन्या राजकीय वैराची धार असल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे कदम आणि तटकरे यांच्यातील जुना वाद या निमित्ताने जिल्ह्याच्या पटलावर आला असतानाच पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि खासदार सुनील तटकरे एकाच गाडीतून गेल्याने देखील नव्या समि‍करणांना सुरूवाच झाल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र शासकीय विश्रामगृहावर राजकीय ड्रामा आणि ‘कोल्ड वॉर’ चा घडलेला प्रकार दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT