Ratnagiri Politics : धक्कादायक! निकाल लागताच कोकणात बड्या नेत्याने ठाकरेंची साथ सोडली, राजीनाम्याने शिवसैनिकांमध्ये खळबळ

shekhar ghosale resignation shivsena ubt : जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. ज्यानंतर शिवसेनेला धक्के लागण्यास सुरूवात झाली आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT News Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला.

  2. पराभवाची जबाबदारी स्वीकारत तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.

  3. या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली असून पक्षांतर्गत चर्चा रंगली आहे.

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात पुन्हा एकदा महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. संगमेश्वर तालुका वगळता उर्वरित जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीला देखील अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला बरोबर पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापनेकडे पाऊल टाकले आहे. यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के बसण्यास सुरूवात झाली असून पहिला राजीनामा पडला आहे. ठाकरेंची साथ तालुकाप्रमुखाने सोडत तडकाफडकी आपल्या पदाची राजीनामा दिला आहे. यानंतर शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात ५६ जागांपैकी तब्बल ४१ जागांवर शिंदेंच्या शिवसेनेनं विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजप (४ जागा) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येकी ५ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेचे इंजन देखील धावले असून एका जागेवर विजय मिळाला आहे. तसेच पंचायत समितीच्या ११२ जागांपैकी ७४ जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आणत आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर भाजप (१४ जागा), राष्ट्रवादी काँग्रेसने (१३ जागा), ठाकरेंची शिवसेना (११ जागा) तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

जिल्ह्यात अशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या ५ तर पंचायत समितीमध्ये ११ जागा मिळाल्या आहेत. पण कधीकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यात पूर्ण पिच्छेहाट झाल्याचे चित्र आहे. यावरूनच रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेत राजीनाम्याचा भूकंप आला आहे.

Shivsena UBT News
Ratnagiri Politics : कोल्हापूर, पुणे, धाराशिवनंतर आता कोकणातही 'राष्ट्रवादी' एकत्र? उदय सामंतांना होमग्राऊंडवर आव्हान

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सर्वच उमेदवारांचा पराभव झाल्याची जबाबदारी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे दिला आहे. यामुळे शिवसैनिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

राज्यात सत्ता पालट आणि शिवसेनेतच पडलेल्या फुटीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आताही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. पण सर्वसामान्य शिवसैनिक आजही ठाकरेंबरोबर असल्याचे नुकताच झालेल्या निवडणुकीत स्पष्ट होत आहे. जवळपास 45 हजारहून अधिक मते ठाकरेंच्या उमेदवारांनी घेतली आहेत. ज्याचा आता उदय सामंत यांना आत्म परिक्षण करण्यास भाग पाडणारे आहे.

पण असे चित्र असतानाही शेखर घोसाळे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण याच घोसाळे यांनी तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर तालुक्यात संघटना बांधणी केली होती. त्यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण करत शिवसेनेची होणारी पडझड थांबवली होती. दरम्यान आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना, आपण ठाकरे प्रेमी असून यापुढे शिवसैनिक म्हणून काम करत राहू. कोणत्याही अन्य पक्षात जाण्याचे आपल्या मनात नसल्याचे त्यांनी सांगितले.

Shivsena UBT News
Ratnagiri Politics : दादांच्या राष्ट्रवादीचा कोकणात महायुतीला अडचणीत आणणारा आणखी एक निर्णय? आमदार शेखर निकम यांची मोठी घोषणा

FAQs :

1. रत्नागिरीत ठाकरे गटाला किती जागा मिळाल्या?
या निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

2. शेखर घोसाळे यांनी राजीनामा का दिला?
निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला.

3. राजीनामा कोणाकडे पाठवला?
जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे राजीनामा पाठवण्यात आला.

4. या पराभवाचा पक्षावर काय परिणाम होईल?
स्थानिक संघटनेवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

5. पुढे नेतृत्व बदल होण्याची शक्यता आहे का?
पक्षांतर्गत चर्चेनंतर नेतृत्वात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com