Teacher Recruitment Sarkarnama
कोकण

Teacher Recruitment : धक्कादायक! टीईटी घोटाळ्यातील 13 उमेदवारांचे शिक्षक भरतीसाठी अर्ज

Ratnagiri Teacher Recruitment News : पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत टीईटी घोटाळ्याचे कनेक्शन उघड झाले असून ३ संशयित उमेदवारांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने 'पवित्र पोर्टल'द्वारे सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेदरम्यान सन २०१८-१९ मधील गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील १३ संशयित उमेदवारांनी रत्नागिरीत शिक्षक भरतीसाठी अर्ज केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सायबर क्राईमकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल १ हजारहून अधिक पदे रिक्त असून पवित्र पोर्टलद्वारे ४७८ शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत.

सलग तीन दिवस चाललेल्या कागदपत्र पडताळणीत ४५७ उमेदवारांची तपासणी पूर्ण झाली आहे, तर २१ उमेदवार गैरहजर राहिले आहेत. २०१८-१९ च्या टीईटी घोटाळ्यातील १३ संशयित उमेदवारांनी येथे अर्ज केल्याचे आढळल्यानंतर शिक्षण विभागाने त्यांची नावे सायबर क्राईम, पुणे यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवली आहेत.

तिथून कसून तपासणीचा अहवाल आल्यावरच त्यांना नियुक्ती द्यायची की नाही, याचा निर्णय होणार आहे. कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊनही समुपदेशन न झाल्याने उमेदवार आणि पालक जिल्हा परिषदेत चौकशी करत आहेत.

यावर शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, समुपदेशनाची सर्व माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात समुपदेशन होणार असून उमेदवारांना आज-उद्यामध्ये ई-मेलद्वारे माहिती पाठवली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT