Aditi Tatkare CM Ladki Bahin Yojana  sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : 1500 नाही, आता थेट 4500! लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी 3 हप्त्यांची लॉटरी?

ladki bahin yojana 4500 rupees update : लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 4500 रुपये मिळणार का? मकर संक्रांतीपूर्वी 3 हप्ते देण्याची शक्यता, पात्रता आणि संपूर्ण माहिती वाचा.

Rashmi Mane

ladki bahin yojana installment date : महाराष्ट्रातील महिलांसाठी दिलासादायक आणि आनंद देणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच एकाच वेळी 4500 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत दरमहा 1500 रुपये मिळणाऱ्या या योजनेत आता तीन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार आहे.

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागू असतानाही या योजनेचा हप्ता कसा वितरित करता येईल, याबाबत सरकार स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा विचार केला जात आहे. यामुळे एकाच वेळी 4500 रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी हे तीनही हप्ते महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्तेही मकर संक्रांतीपूर्वी देण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.

दरम्यान, या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यात सुमारे 2 कोटी 42 लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र आतापर्यंत केवळ सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केल्याची माहिती महिला आणि बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे. उर्वरित महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून ई-केवायसीसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या महिलांची प्रक्रिया अपूर्ण आहे, त्यांना दिलासा मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT