Ambedkar Family Property Controversy: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भूमाफियांनी पालिकेचे आरक्षणा असलेल्या जमिनीवर भल्या मोठ्या टोलिजंग इमारती बांधण्यात आल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. डोंबिवली जवळील दावडी परिसरात तर भूमाफियांनी चक्क राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत टोलेजंग इमारत उभारली आहे. विशेष म्हणजे 2023 साली तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम झाल्यापासून याप्रकरणी तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने याकडे केवळ नोटीसा देत दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय.
2023 साली अनधिकृत घोषित केलेल्या या इमारतीवर 20 मे रोजी कारवाई केली जाणार असून ही इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे. दरम्यान, या बांधकामा विरोधात पालिका प्रशासनाने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देत कारवाईसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
डोंबिवली जवळील कल्याण-शील मार्गालगत दावडी येथील सेंट जॉन शाळेसमोरी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी सात मजली इमारत उभी केली आहे. या जमिनीच्या 7 /12 वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह आणखी दोन नावे आहेत.
दरम्यान आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येताच आनंदराज आंबेडकर यांनी संबधित भूमाफियाला जाब विचारत याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्याना देत याप्रकरणी मदत करण्याची मागणी केली होती. यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी याप्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली होती.
मागील अडीच वर्षापासून नवसागरे याप्रकरणी पाठपुरावा केला होता. या दरम्यान एका विकासकाने अर्धवट काम सोडले होते यानंतर दुसऱ्या विकासकाच्या मदतीने संबधित भूमाफियाने अर्धवट राहिलेल्या इमारतीचे काम पूर्ण केले असून 8 मजली इमारत उभी करण्यात आली आहे .
महसूल विभागासह पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता पालिका प्रशासनाच्या वतीने आय प्रभागाचे अधीक्षक नितीन चौधरी यांनी विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली असून संबधित प्रकरणी पोलिसांनी एम आर टीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी या अनधिकृत इमारतीवर 20 मे रोजी तोडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. असून यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त मिळण्याची मागणी पोलीस उपायुक्ताकडे केली आहे. 20 तारखेला ही इमारत जमीनदोस्त करण्यात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.