Bhushan Gavai Judge Journey :भूषण गवई न्यायाधीश कसे झाले? आईनं सांगितला वडीलांसोबतचा 'तो' किस्सा

Bhushan Ramkrishna Gavai 52nd Chief Justice of India: तो धाडसी असून कुणासमोरही झुकणारा नाही. न्यायाधीश असून तो घरात असताना साधेपणाने राहतो. वाटत नाही तो इतका मोठा जज आहे.
Bhushan Ramkrishna Gavai 52nd Chief Justice of India
Bhushan Ramkrishna Gavai 52nd Chief Justice of IndiaSarkarnama
Published on
Updated on

Justice Bhushan Gavai Biography: सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती भूषण गवई हे आज सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश बनणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देणार आहेत. भूषण गवई हे न्यायाधीश कसे झाले याबाबत त्यांची आई कमलाताई गवई यांनी किस्सा सांगितला आहे.

न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे देशाचे सरन्यायाधीश कसे झाले याबाबत कमलताईंना विचारले असता त्या म्हणाल्या,'माझ्या मुलाच्या मनात जे असते तेच तो करतो. न्यायाचा मार्गात त्याला कोणीच अडवू शकत नाही. म्हणूनच तो एक चांगला सरन्यायाधीश होण्यास पात्र ठरेल असा मला विश्वास आहे. तो अतिशय धाडसी असून कठिण परिस्थितीत न डगमगता लढत असतो.

भूषण गवई हे न्यायाधीश कसे झाले, याबाबत कमलाताईंना मजेदार किस्सा सांगितला. एकदा भूषण त्यांच्या वडीलासोबत वकीली व्यवसायाबाबत चर्चा करीत होता. वकील होऊन पैसे कमायचे की न्यायाधीश बनून न्यायदान करायचे, या विषयावर बाप-लेकात दीर्घकाळ चर्चा झाली, त्यानंतर त्याने (भूषण) न्यायाधीश होण्याचा निर्णय घेतला.

Bhushan Ramkrishna Gavai 52nd Chief Justice of India
Dombivli BJP : कल्याणमध्येही भाकरी फिरवली! जिल्हाध्यक्षपदाची माळ रवींद्र चव्हाणांच्या निकटवर्तीयाच्या गळ्यात

तो देशातील जनतेला न्याय देईन, असा विश्वास कमलाताईंनी व्यक्त केला. तो धाडसी असून कुणासमोरही झुकणारा नाही. न्यायाधीश असून तो घरात असताना साधेपणाने राहतो. वाटत नाही तो इतका मोठा जज आहे. देशसेवेची भावना त्याने वडीलांपासून शिकली आहे.

कमलाताई म्हणाल्या, "घरी एकटा असताना कोणी पाहुणे आले तर तो स्वत: त्यांना पाणी देतो, तो खूर्चीवर असतो तेव्हा जज असतो, अन्य वेळी सामान्य व्यक्ती असतो. त्यांच्या वडीलासोबत मुंबईमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना तो जमिनीवर चादर टाकून झोपत असे, मला विश्वास आहे की तो देशातील नागरिकांना न्याय देईन," त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

Bhushan Ramkrishna Gavai 52nd Chief Justice of India
Pune Police: गजा मारणेची पार्टी पुणे पोलिसांना भोवली! नियम धाब्यावर बसवून ढाब्यावर मारला मटणावर ताव

येत्या 23 नोव्हेंबरला गवई हे 65 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशपदाचा त्यांचा कार्यकाळ हा सहा महिने असणार आहे. भूषण गवई हे सरन्यायाधीश बनणारे दलित समाजातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी, 2007 मध्ये केजी बाळकृष्णन यांनी सरन्यायाधीशपद भूषवले आहे. ते दलित समाजातील होते. बाळकृष्णन यांनी तीन वर्षे सरन्यायाधीशपद भूषवलं होतं.

सरन्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या मराठी व्यक्ती

  1. न्या यशवंत चंद्रचूड,

  2. न्या. शरद बोबडे,

  3. न्या. धनंजय चंद्रचूड,

  4. न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर

  5. न्या. उदय उमेश लळित

  6. न्या भूषण गवई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com