Laxman Hake targets Ajit Pawar over alleged mismanagement of OBC funds, raising serious political questions Sarkarnama
महाराष्ट्र

OBC Politics : 'अजित पवार ओबीसींना निधी देताना हात आखडता घेतायेत...', मिटकरींच्या टीकेनंतर हाकेंचा हल्लाबोल

Laxman Hake Criticized Ajit Pawar: 20 वर्षांपासून अजित पवार अर्थमंत्री आहेत. मात्र, सामाजिक न्यायाच्या बाबतीत हा माणूस नेहमीच दुजाभाव करतोय, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

Roshan More

Laxman Hake Vs Amol Mitkari : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीत लोहा कंधार आणि भोकर मतदारसंघात ओबीसी उमेदवारांवर दबाव टाकून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला होता. मिटकीर यांनी आपल्या ट्विटवरून काही ऑडिओ क्लिप देखील शेअर केल्या. मिटकरींच्या टीकेनंतर त्याला लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

हाके म्हणाले, 'आम्ही 14 ओबीसीचे उमेदवार उभे केले होते. तसेच बाकीच्या ठिकाणी महायुतीला जाहीर पाठींबा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांना पाठींबा दिला होता. फडणवीसांवर विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलतंय कोण? माघार घेतलेल्या माणसाशी कशी अ‍ॅडजेस्टमेन होऊ शकेल.'

'आम्ही अजित पवारांना प्रश्न विचारतोय तुम्ही ओबीसींच्या मुलांना वस्तीगृह देणार की नाही? आम्ही अजितदादांना विचारतोय तुम्ही महाज्योतीला निधी देताना हात आखडता का घेता? आमच्या 50 ते 60 टक्के ओबीसींना बजेटरी तरतूद का देत नाही?' असे म्हणत हाके यांनी ओबीसींना अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप केला.

'20 वर्षांपासून अजित पवार अर्थमंत्री आहेत. मात्र, सामाजिक न्यायाच्या बाबतीत हा माणूस नेहमीच दुजाभाव करतोय. आम्ही याबाबत ओबीसीच्या एससी एसटीच्या निधीबाबात विचारले तर आमच्यावर वैयक्तीक स्वरुपात अ‍ॅटॅक केले जात आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर चव्हाण,मिटकरी उत्तर काय देतायते? माझ्यावर वैयक्तीक अॅटॅक केले जातायेत ही राष्ट्रवादीची वैचारिक दिवाळखोरी आहे.', असा हल्लाबोल हाके यांनी अमोल मिटकरी यांच्यावर केला.

महायुतीला प्रश्न विचारणार...

आम्ही निवडणुकीत महायुतीला पाठींबा दिला होता. त्यामुळे ओबीसींचा, एससी एसटीचा निधी वळवला जात असेल तर आम्ही त्याच्याविषयी प्रश्न विचारणार, असे हाके म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकजे आचार विचार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा काय? असे त्यांना विचारायला पाहिजे, असे देखील हाके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT