Nagpur Woman Crosses Indian Border: पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून नागपूर पोलिसांनी सुनीता जामगाडे या महिलेला अटक केली आहे. सुनीताच्या अटकेनंतर नवनवी माहिती समोर येत आहे. सुनीता आपल्या तेरा वर्षाच्या मुलाला सोडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली होती. भारताची सीमा ओलांडून तीने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानच्या रेंजरसने तिची चौकशी करत तब्बल 10 दिवसांनी भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या सुपूर्द केले. त्यानंतर अमृतसर पोलिसांनी सुनीताला नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
नागपूर पोलिस सुनीताची चौकशी करत आहेत मात्र ती सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. आज (मंगळवार) तिची पोलिस कोठडी संपणार नाही. दरम्यान, पोलिस चौकशीत सुनीता ही पाकिस्तानातील तीन नागरिकांच्या संपर्कात असल्याची समोर आले आहे. तिच्या सोशल मिडिया अकाऊंटची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सुनीताचा फोन फाॅरम्याट केलेल्या आहे. त्यातील माहिती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत केला जात आहे. दरम्यान, सुनीता ही इंन्स्टाग्रामवरून तीन पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होती. झुल्फेकर, असद आणि तौफिक असे संपर्कात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे नाव आहे. विशेष म्हणजे ती तिघांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्याचेही समोर आले आहे.
तिघांच्या सतत संपर्कात ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांना भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याचे तपासातून समोर आले आहे. हे तिघे पाकिस्तानी नागरिक आहेत की गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणारे एजंट? त्याचा तपास आता केला जात आहे. नागपूर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी सुनीताचा इंन्स्टाग्राम, फेसबुक अकाउंटची तपासणी सुरु केली आहे.
सुनीता ही उडवा उडवीची उत्तरे देत आहे. ती 4 मे रोजी आपल्या 13 वर्षीय मुलासोबत नागपूरवरुन निघाली होती. 14 मेला ती एलओसीवरील शेवटे गाव असलेल्या हुंडरमान येथे आली. आपल्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून तिने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. तब्बल 10 दिवस ती पाकिस्तानच्या ताब्यात होती. पाकिस्तानी रेंजर्सने तिलानंतर भारताच्या स्वाधीन केले. दरम्यान, चौकशीत आपण पाकिस्तानमधील रुग्णालयात काम करण्यासाठी गेल्याचे ती सांगत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.