Laxman Hake Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Hake Vs Jarange : मनोज जरांगे उपोषणाला बसताच लक्ष्मण हाके आक्रमक, म्हणाले, 'मराठा आमदार-खासदारांसाठी...'

Laxman Hake Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन हे लेकराबाळांसाठी नाही तर मराठा समाजातील नेते, कारखानदार, माजी आमदार, खासादारांसाठी असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

Roshan More

Laxman Hake News : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये आपले उपोषण सुरू केले आहे. हा शेवटचा लढा असल्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. दरम्यान, ते उपोषणाला बसल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.

हाके म्हणाले, शेवटचा लढा आणि ओबीसीच आरक्षण गाडा, हे धोरण मनोज जरांगेच आहे. अनअधिकृत प्रमाणपत्र काढा ओबीसीला मातीत गाडा, असे त्याच म्हणण आहे.

'हे मनोज जरांगेच आंदोलन हे लेकराबाळांच्या आरक्षणासाठी नाही. ते मराठा कारखानदार, आजी-माजी आमदार-खासदार , मंत्र्यांची अनव्हॅलीड सर्टिफिकेट व्हॅलीड करून घेण्याचा हा प्रयत्न आहे.', असा दावा देखील त्यांनी केला आहे.

'महाराष्ट्रातील ओबीसींना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, ओबीसीच्या बाहेरच आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं. आत्ता शासनाने बेकायदेशीर जीआर काढून कुणबी दाखल हा मागासवर्गीयचा दाखल हा जो पायंडा पाडलाय संविधान विरोधी आहे. ओबीसींच्या अन्नात माती कालवणारा आहे.', असे देखील ते म्हणाले.

ओबीसींची ताकद दाखवणार

एक सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातून पाटस टोलनाक्यावरून आम्ही मुंबईकडे निघणार आहोत. हे आंदोलन आमदार खासदारांचं नाही. गावगाड्यातील सामान्य ओबीसी भटक्या विमुक्तीचं हे आंदोलन आहे. मुंबईतील कोळी समाजातील बांधव या संघर्षात सामील होईल, असे देखील हाके यांनी एक सप्टेंबरच्या मोर्चाच्या बाबत सांगितले.

ओबीसींना वाऱ्यावर सोडलं

पुढे बोलताना ते म्हणाले, या सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडलं आहे. ओबीसींच्या हक्काच संरक्षण हे सरकार करत नाही. त्यामुळे माझं तुम्हाला आवाहन आहे की, आरक्षण वाचवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर जन्माला येणार नाहीत. आता तुमची भाषा आमदार खासदार बोलणार नाही. तुमच्या हक्कासाठी तुम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल, अशी माझी कळकळीची विनंती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT