OBC leaders Pune meeting: पुण्यातून एल्गार! ओबीसी नेत्यांची थेट आता मुंबईवर धडक; 'या' तारखेला घेरणार!

OBC community protest News : ओबीसी समाजाच्या पुण्यातील बैठकींनंतर मोठी घोषणा करण्यात आली. या बैठकीनंतर ओबीसी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.
laxman hake, navnath waghmare
laxman hake, navnath waghmare Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यात ओबीसी समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. लक्ष्मण हाके, मंगेश ससाने इतर ओबीसी नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानंतर आणि जरांगे यांनी केलेल्या विरोधानंतर ओबीसी समाजाच्या पुण्यातील बैठकींनंतर मोठी घोषणा करण्यात आली. या बैठकीनंतर ओबीसी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईत 1 सप्टेंबरला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.

पुण्यात ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या ओबीसी नेत्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. त्याचवेळी येत्या 1 स्प्टेंबरला मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून अनेक ठिकाणी ओबीसी समाजाच्या जागा बळकावण्यात आल्या. सर्व ओबीसी नेत्यांच्या जाती काढण्यात आल्या. बावनकुळे यांच्यावर खालच्या थराला जाऊन अपमान करण्यात येत आहे. जरांगे कुठला कायदा लागू नसल्यासारखे वागत आहेत. गेली काही दिवसापासून आम्हाला ललकारले जात आहे. आम्हाला आव्हान दिले जात आहे. येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत, असे ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी स्पष्ट केले.

laxman hake, navnath waghmare
Maharashtra Live Update: शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घातलं थेट आमदारांनाच साकडं

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओबीसी आमचा डीएनए आहे. ओबीसींना वाटले की कुणीतरी आमच्या बाजूने बोलणारे आहे. छगन भुजबळ, मुंडे बंधू-भगिनी, बावनकुळे यांच्यावर बोलणे सुरु झाले आहे. आमचे मंत्री, आमदार झोपले असतील, घाबरले असतील पण ओबीसी समाज झोपलेला नाही, असे नवनाथ वाघमारे म्हणाले.

laxman hake, navnath waghmare
Maharashtra Live Update: शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घातलं थेट आमदारांनाच साकडं

“सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी कुठलाही विचार केला नाही. मंगेश ससाणेंनी वास्तव सांगितले आहे. आम्हाला पोलीस संरक्षण घेऊन फिराव लागत आहे. आम्ही काय गुंड मवाली आहोत काय? मराठा समाजातील गरीबांसाठी जर ओबींसीचे आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसीतील गरीबांचे काय? सरकारने संवैधानिक तत्वाला हरताळ फासला आहे. आम्ही हारलो आहोत. अंत्यंत खेदाने नमुद करावे लागते. ओबीसींचे आरक्षण संपले आहे. ओबीसी आरक्षण संपले आहे. त्याची ना सरकारला खंत आहे, ना ओबीसी नेंत्यांना आहे. ओबीसी ही विखुरलेली फेसलेस कम्युनिटी आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com