Laxman Hake  sarkarnama
महाराष्ट्र

Laxman Hake Video : मराठा समर्थक लक्ष्मण हाकेंच्या अंगावर धावले, दोन गटात हाणामारी

Laxman Hake Maratha Supporters Clash : आडेगाव येथील बिरोबा मंदिरात लक्ष्मण हाके दर्शनासाठी गेले असता तेथे गटात हाणामारी झाली. मराठा तरुण हाकेंच्या अंगावर धावले.

Roshan More

Laxman Hake News : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आडेगाव येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक खळबळजनक घटना घडली आहे. पोखरापूरच्या बिरोबा मंदिरातील यात्रेत देवदर्शनासाठी आलेले ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि मराठा समर्थकांमध्ये जोरदार तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आडेगाव येथील बिरोबा मंदिरात लक्ष्मण हाके दर्शनासाठी गेले असता पूजऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांचा सत्कार सुरू होता. त्याचवेळी मराठा समर्थकांनी "तुम्ही इथे कशाला आलात?" असा आक्रमक सवाल करत हाकेंच्या उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेतला. सुरुवातीला दोन्ही गटांत शाब्दिक चकमक झाली; मात्र, बघता बघता याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. काही तरुण थेट हाकेंच्या अंगावर धावून आल्यानंतर हाकेंच्या समर्थकांनीही जोरदार प्रतिकार केला, ज्यामुळे मंदिराच्या प्रांगणातच मोठा राडा झाला.

या हिंसक घटनेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवला आहे. हाके म्हणाले, "देवाच्या दारात असं कृत्य कितपत योग्य आहे? आम्ही कुठे फिरायचंच नाही का? नक्की अडचण काय आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, केवळ प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आणि स्वतःचे मोठेपण दाखवण्यासाठीच विघ्नसंतोषी तरुणांनी हा स्टंट केल्याचा आरोप त्यांनी केला.

हल्ल्यांना घाबरत नाही...

अशा धमक्या आणि हल्ल्यांना न घाबरता आमचा ओबीसी लढा यापुढे अधिक तीव्र करू, असा थेट इशाराच लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. आम्ही केवळ देवदर्शनासाठी गेलेलो होतो. त्यांनी अंगावर आल्यांनतर आमच्याही कार्यकर्त्यांनी प्रतिकार केला, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT