Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar News : ''..त्यामुळे आता मुख्यमंत्री 'लाडका बिल्डर' योजना महाराष्ट्रात येणार आहे का?'' ; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल!

Vijay Wadettiwar on CM Eknath Shinde : '...हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा आहे.', असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Vijay Wadettiwar Press News : विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभाराच्या कारभारवर जोरदार टीका केली आहे. 'गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) हे प्रचितगड या शासकीय निवासस्थानी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 'सरकारची तिजोरी खासगी बिल्डरसाठी महायुती सरकारने खुली ठेवली आहे. हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा आहे.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा निर्णय मान्य आहे का हा देखील प्रश्न आहे. मे. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्लीस्थित कंपनीवर ही मेहेरनजर दाखविण्यात आली आहे. 2021 मध्ये या विकासकाशी म्हाडाने करार केला.

मात्र आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थीना दिलेला नाही, असे असताना त्याला 400 कोटींची खिरापत का दिली जातेय?. गृहनिर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविला. त्यानंतरही हा निधी देण्यासाठी कोण दबाव आणतंय? याची चौकशी झाली पाहिजे.'

तसेच सीबीआयने कारवाई केल्यावर तुरूंगात गेलेला डिंपल चढ्ढा हा बांधकाम व्यावसायिक राज्य सरकारचे पैसे घेऊन परदेशात पळून गेला तर? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

याशिवाय वडेट्टीवार म्हणाले की, 'बार्टीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. तरी देखील सरकारला जाग येत नाही. सरकारची शिष्यवृत्ती द्यायची मानसिकता नाही.

कारण कमिशन, टक्केवारी जिथे मिळत नाही तिथे सरकार पैसे खर्च करत नाही. अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे.' तसेच 'महाज्योती आणि सारथी या संस्थांच्या विद्यार्थ्यांची देखील अशीच परिस्थिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सरकारने शिष्यवृत्ती द्यावी.', अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.

विदर्भात प्रचंड पावसामुळे मोठे नुकसान -

याचबरोबर वडेट्टीवार म्हणाले की, 'विदर्भात प्रचंड पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर येथील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर परिसरात देखील अशीच परिस्थिती आहे. सुरक्षित स्थळी लोकांना हलवून त्यांना आवश्यक सुविधा देणं महत्वाचं आहे.

तसेच लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या निवारा, जेवण, आरोग्याची व्यवस्था करावी. पशुधन देखील अडचणीत सापडले असून पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी.', अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT