Ajit Pawar : मुंबईसाठी शिंदे-फडणवीसांचे देव पाण्यात; मात्र अजितदादांच्या निर्णयामुळे अडचण

Eknath Shinde Devendra Fadnavis problem due to Ajit Pawar decision of independence : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याने शिंदे-फडणवीसांसोबत अजितदादा मुंबई महापालिकेसोबत राहणार नाहीत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपची साथ सोडणार आहेत.

अर्थात महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनीच जाहीर करून टाकले. त्यामुळे मुंबई महापालिकेतून ठाकरेंची सत्ता घालवण्यासाठी देव पाण्यात ठेवलेल्या शिंदे-फडणवीससोबत अजितदादा मुंबई महापालिकेसोबत राहणार नाहीत.

मुंबईमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची (NCP) ताकद फारशी नसली, तरी ठाकरेंना धक्का देण्यासाठी शिंदे-फडणवीसांना छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधावीच लागणार आहे. मात्र अजितदादांनी स्वबळाचा पवित्रा घेतल्याने मुंबईत शिंदे-फडणवीसांची अडचणी होऊ शकते. पण या मित्रांची अडचणी होऊ नये, आणि या दोघांच्या निमित्ताने मुंबईत आपली ताकद वाढवण्याच्या अपेक्षाने अजितदादा मुंबई महापालिकेचा वेगळा निर्णय घेऊ शकतात का, असेही बोलले जात आहे. अजितदादाच्या या भूमिकेचा फैसला विधानसभा निवडणुकीनंतरच होणार आहे. त्यामुळे आणखी काही महिने वाट पाहवी लागेल.

Ajit Pawar
Sanjay Raut On Amit Shah: अमित शाह गृहमंत्री आहेत, हे सांगायला लाज वाटते!

महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदावर बसलेल्या ठाकरेंना शिंदे-फडणवीसांनी राजकीय डाव करत सत्तेवरून खाली खेचले आणि ठाकरेंचे सरकार पाडले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना (Shiv Sena) देखील फोडून नाव आणि पक्षचिन्ह शिंदेंनी आपल्याकडे घेतले. याच काळात ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिकेतही, शिंदेंनी ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आणि ठाकरेंकडचे तब्बल ५० माजी नगरसेवक नव्या शिवसेनेत घेतले. काही करून ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या सत्तेत येऊ द्यायचे नाही, असे कुटनीती फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आहे. त्यांना आता शिंदे यांची साथ मिळाली आहे.

Ajit Pawar
Maharashtra Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर; विधानसभा निवडणुकीच्या...

मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे-फडणवीस हे राज ठाकरे यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्याकडे ठेवण्याच्या तयारीत असावेत. मात्र विधानसभेनंतर या दोघांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस 'एकला चलो रे'च्या भूमिकेत असल्याचे दिसते. त्यामुळे मुंबई महापालिकेत अजितदादांची साथ शिंदे-फडणवीस यांना मिळणार नसल्याचे दिसते. अजितदादांची मुंबईतील काही भागात ताकद आहे. शिंदे-फडणवीस यांना महापालिकेतील निवडणुकीत त्यांची मोठी मदत होऊ शकते. परंतु अजितदादांच्या 'एकला चलो रे'च्या धोरणामुळे शिंदे-फडणवीस यांची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोंडी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com