Maharashtra legislative council election  Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election : विधान परिषद निवडणुकीची मोठी अपडेट, चार जणांचे उमेदवारी अर्ज बाद, छाननीनंतर कोणाची आमदारकी पक्की? सगळं आलं समोर!

BJP NCP Shivsena : विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जाची छाननी शनिवारी करण्यात आली. त्यामध्ये चार जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Roshan More

MLC Election News : विधान परिषदे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 9 जागांसाठी आणि एका पोटनिवडणुकीसाठीसाठी ही निवडणूक होणार होती. 12 मे रोजी मतदान होणार होते. भाजपकडून पाच उमेदवारांसह पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन, राष्ट्रवादीकडून एक आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

उमेदवारांनी दाखल केलेल्या उमदेवारी अर्जाची छाननी शनिवारी करण्यात आली. त्यामध्ये अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या चार जणांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. याबाबतची घोषणा सोमवारी (ता.4) करण्याची शक्यता आहे.

प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे 5, शिवसेना (शिंदे) 2, राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना ( 1) अशा नऊ प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे या उमेदवारांची आमदारकी पक्की झाली आहे.

'या' नेत्यांची आमदारकी पक्की

भाजप - प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर, प्रज्ञा सातव

शिवसेना (शिंदे) - निलम गोऱ्हे, बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेस - झिशान सिद्दीकी

शिवसेना (ठाकरे ) - अंबादास दानवे

बिनविरोध निवडणूक

अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसरा उमेदवार देत या निवडणुकीत चुरस निर्माण करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिंदेंनी तिसरा उमेदवार दिला नाही. तसेच काँग्रेस देखील नाराज होती मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांची समजूत काढली त्यामुळे काँग्रेसने देखील अंबादास दानवेंना पाठींबा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT