BJP MLC Election: मोठी बातमी: भाजपचं विधान परिषदेसाठी धक्कातंत्र,अंदाज चुकवला; उमेदवारांची यादी अखेर जाहीर, कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट?

MLC Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार आहेत. मात्र, अद्याप विधानपरिषदेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नव्हते.
BJP Core Committee Meeting | MLC Candidate Selection
Senior BJP leaders arrive at Varsha bungalow for the core committee meeting to discuss MLC candidate selection ahead of elections.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार आहेत. मात्र, अद्याप विधानपरिषदेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नव्हते. पण आता भाजपनं आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विशेष म्हणजे भाजपनं धक्कातंत्र वापरताना सर्व नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

भाजपनं मंगळवारी (ता.28) विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यातविद्यमान आमदारांपैकी एकाला संधी देण्यात आले नसल्याचं समोर येत आहे.भाजपच्या यादीत विवेक कोल्हे ,संजय भेंडे, माधवी नाईक, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव,सुनील कर्जतकर असे उमेदवारी जाहीर झालेल्या नेत्यांची नावे आहेत.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेसाठी भाजपच्या कोअर कमिटीने जवळपास 30 जणांची यादी तयार करून ती दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवली होती. मात्र, अवघ्या 6 जागांसाठी 30 जणांची यादी पाठवल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी या यादीतील डझनभर नावे कमी करून सुधारित यादी पुन्हा पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली होती.

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी भाजपकडून सुरुवातीला 30 जणांची यादी तयार करण्यात आली होती. ही यादी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. मात्र, यादी मोठी असल्याने मर्यादित नावेच पाठवण्याच्या सूचना दिल्लीतून आल्यानंतर महाराष्ट्र भाजपने जवळपास अर्धी नावे कमी करून सुधारित यादी पुन्हा पाठवली आहे.

BJP Core Committee Meeting | MLC Candidate Selection
Fadnavis Visit to Deshmukh Home : देवेंद्र फडणवीसांची सुभाष देशमुखांच्या घरी अचानक भेट; देशमुख पिता-पुत्रांसोबत बंद दाराआड चर्चा

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. महायुती अन् महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चितीचं काम सुरू आहे. भाजपची यादी दिल्ली जाऊन, पुन्हा मुंबईत येऊन धडकली होती. यात कोणाची वर्णी लागली, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

दरम्यान, विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधील अनेक इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अंतिम यादीतून ज्यांची नावे वगळली जातील, त्यांच्यात नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे भाजप सध्या सावध भूमिका घेत असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती.पण आता भाजपनं विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना महायुतीसह महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

पण याचवेळी अहिल्यानगरमधून भाजपला पाचवा आमदार निश्चित झाल्याच्या चर्चांना जोर आला होता. कारण विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली होती.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी इथं केलेल्या विधानामुळे कोल्हे यांच्या नाव जवळपास निश्चित असल्याचे संकेत मिळाले होते. आणि भाजपची यादी जाहीर होताच कोल्हेंबाबतचा तो अंदाज खरा ठरल्याचं समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com