Mahadev Jankar News : महायुतीकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. भाजपकडून पाच, शिंदे गटाकडून दोन तर अजित पवार गटाकडून दोन उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत. मात्र, महायुतीच्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे नाव नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची विधान परिषदेची मुदत संपत आहे. मात्र जानकरांना पुन्हा विधान परिषदेमध्ये संधी मिळणार नसल्याचे निश्चित आहे. मात्र, उमेदवारी मिळाली नसतील तरी आपल्याला राज्यसभेचा शब्द मिळाल्याचे जानकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून महायुतीकडून महादेव जानकर उमेदवार होते. त्यांना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी पराभूत केले होते. त्यात जानकर यांची विधान परिषदेची मुदत संपत असल्याने ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य असणार नाहीत.
ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी MVA अशी लढत होईल. जानकर हे महायुतीमध्ये असणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत देखील ते काही जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे पुनर्वसन करणे महायुतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
पंकजा मुंडे Pankaja Munde, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, भावना गवळी, कृपाल तुमाने हे महायुतीचे उमेदवार असणार आहे. तर, महाविकास आघाडीकडून मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, प्रज्ञा सातव हे उमेदवार असणार आहे.
11 जागांसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता त्यांचे दोन उमेदवार विजयी होतील. मात्र, महाविकास आघाडीकडून तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झाल्याने निवडणूक होणार हे निश्चित. 5 जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.