Vidhansabha Election News : कोल्हापुरात राजकीय वारसदारासाठी जुळवाजुळव तेजीत; जनता घराणेशाही स्वीकारणार का?

Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात अर्धा डझनपेक्षा अधिक राजकीय वारसदार आमदार होण्याची स्वप्ने पाहत आहेत. चिरंजीव आणि कन्येसाठी जोडण्या सुरू ठेवल्याचे चित्र आहे.
Maharashtra Political Parties
Maharashtra Political PartiesSarkarnama

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अनेकांनी गेल्या दोन वर्षांपासूनच राजकीय जोडण्यासोबत मतदारसंघातील प्रचार आणि जनसंपर्क सुरू ठेवला आहे. अशातच प्रस्थापितांचा राजकीय वारसदार निवडण्यासाठी यंत्रणा गतिमान झाल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील जवळपास अर्धा डझनपेक्षा अधिक राजकीय वारसदार आमदार होण्याची स्वप्ने पाहत आहेत. राजकीय महत्त्वकांक्षा जागृत झाली असून अनेकांनी आपल्या चिरंजीव आणि कन्येसाठी विधानसभेच्या जोडण्या सुरू ठेवल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संघर्षपूर्ण लढतीत मतदार त्यांचा मार्ग प्रशस्त करणार का? याचे कुतूहल असणार आहे. (Vidhansabha Election News)

कोल्हापूर जिल्ह्यात पक्षापेक्षा गटातटाला अधिक महत्त्व आहे. जिल्ह्यातील बड्या घराण्यातील तालुका तालुक्यात आपले गट तट शाबुत ठेवले आहेत. अशातच अनेक राजकीय घराण्याचा उदय झाला. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असणाऱ्या या घराण्यातील काहींनी राष्ट्रवादीच्या उदयानंतर आपले राजकीय घराण्याचे विस्तारीकरण केले.

त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय वरदहस्त असणारी घराणे उदयास आली. त्यातीलच आता नवे राजकीय वारसदार तयार करण्याचे वेध काही लोकप्रतिनिधीना लागल्याचे चित्र आहे. त्यातील काही घराण्यांमध्ये पुन्हा राजकीय इच्छाशक्ती जागृत करण्याचे काम सुरू आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhanajay Mahadik) यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातून नुकतीच जाहिरातबाजी केल्यानंतर त्यांची राजकारणात येण्याची इच्छाशक्ती सर्वांनाच दिसून आली. कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चाही आहे.

Maharashtra Political Parties
Vidhan Parishad Election News : मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोडाफोडी;कोणाचे आमदार फुटणार?

शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास दिवंगत आमदार सारे पाटील यांचे चिरंजीव दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष पंडित पाटील हे देखील काँग्रेसकडून (congress) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी तयारी सुरू ठेवली आहे. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर हे देखील शिरोळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर त्यांच्या कन्या नंदाताई बाभुळकर यादेखील सक्रिय झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला आहे. कुपेकर घराण्याचा राजकीय वारसदार म्हणून त्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात.

Maharashtra Political Parties
Ambadas Danve News : मोठी बातमी : अंबादास दानवेंचे पाच दिवसांसाठी निलंबन

दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे देखील राजकीय वारसदार म्हणून पुढे आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला ते काँग्रेसकडून सामोरे जाणार आहेत. त्यानुसार आता राहुल पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवलेला असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

जिल्ह्यातील कागल आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन राजकीय वारसदार हे वडिलांच्या निर्णयावर अवलंबून आहेत. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांचे चिरंजीव राहुल आवाडे इचलकरंजीमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर कागल विधानसभा मतदारसंघांमधून शिवसेनेचे संजय घाटगे यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी सभापती अंबरीश घाटगे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

आमदार प्रकाश आवाडे हे इचलकरंजीतून आणि माजी आमदार संजय घाटगे हे कागलमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. जर हे दोघेही या निवडणुकीत थांबले तर त्यांचे पुत्र राहुल आवाडे इचलकरंजीतून आणि अंबरीश घाटगे हे कागलमधून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Political Parties
Arvind Kejriwal News : केजरीवाल यांच्यावरील याचिकेचा फैसला 17 जुलैला ; दिल्ली उच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com