Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray on MLC Election : ठाकरेंचं गणित पक्कं; विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे आमदार फोडणार?

Legislative Council Election Shiv Sena Uddhav Thackeray : राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे.

Rajanand More

Mumbai : लोकसभा निवडणुकीत महाविजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्याची झलक विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकते, असे संकेत खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आज दिले.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यापैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास ठाकरेंनी व्यक्त काल आहे. याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचे सूचक विधानही केलं आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढणार आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विधानपरिषदेची निवडणूक लढणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, 11 जागा आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक आमदार निवडून येऊ शकतो. वरची कॅलक्युलेशन सांगण्याची नसतात. जयंत पाटलांना (शेकाप) एनसीपी उमेदवारी देणार असेल तर तेही निवडून येऊ शकता.

काँग्रेसकडे 44, शिवसेनेकडे 16 आणि एनसीपीकडे 13 मतं आहे, अशावेळी कोटा पाहता तीन आमदार कसे निवडून येणार, यावर बोलताना ठाकरेंनी सूचक विधान केले. या सगळ्या गोष्टी आता उघड करून सांगितल्या तर मी निवडणूक कशी लढू? आमचं गणित पक्कं आहे. 11 जागांमध्ये एक शिवसेना, एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येतो.

आम्ही जेव्हा निवडणूक लढतोय आणि प्रत्येकाचा एक-एक निवडून येतोय, याची आम्हाला खात्री असेल तर साहजिकच आहे त्यांनी त्यांची मतं कशी सांभाळायची हा त्यांचा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक झाली तर गंमतीशीर होणार आहे. पेढे गुप्तपणे कोण कुणाला भरवतंय, हे तुम्हाला कळेल, असं म्हणत ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढवलं आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT