Uddhav Thackeray: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे म्हणाले, महायुतीच्या अपयशाचा खरा चेहरा समोर येऊ द्या, त्यानंतर....

Uddhav Thackeray on CM Candidate of Mahavikas Aghadi: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत खुद्द उद्धव ठाकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Monsoon Session 2024 : मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव खासदार संजय राऊत यांनी पुढे रेटल्यामुळे आघाडी बिघाडीत होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत खुद्द उद्धव ठाकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.महायुतीच्या अपयशाचा खरा चेहरा समोर येऊ द्या, त्यानंतर योग्यवेळी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बिन चेहऱ्याने मतदान मागणे हे धोक्याचे आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याचा धोका आहे. राज्याने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम पाहिले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा ला जे यश मिळाले, ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच, असा दावा राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. त्यावर ठाकरे यांनी हे स्पष्टीकरणं दिले आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) नॉनस्टॉप ३० मिनिटे पत्रकार परिषदेत बोलले होते. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या 'कामगिरी'वर ते बरसले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शब्दही काढला नाही.

Uddhav Thackeray
Mahadev Jankar: दिल्लीची वाट ठाकरेंच्या बंडू जाधव यांनी रोखली; महादेव जानकर विधान भवनात..

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • निरोप घेण्यासाठीचे या सरकारचे हे अधिवेशन सुरु आहे. जनता शिंदे-फडणवीस-पवार सरकार बाय बाय करताहेत.

  • हे डबल इंजिनचे नव्हे तर गळती सरकार, लिकेज सरकार आहे.

  • सरकारला संवेदना असेल तर त्यांनी दोन वर्षांत किती घोषणा पूर्ण केल्या याची माहिती द्यावी, शेतकऱ्यांना कुणीच वाली राहिलेला नाही.

  • या सरकारला महायुतीचे डबल इंजिनचे सरकार म्हणतात, पण या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा कुणीही वाली नाही.

  • राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे.

  • एनडीएचे सरकार दुर्देवाने पुन्हा आले आहे. निवडणुकीच्या आत शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर करुन त्याची अमंलबजावणी करा.

  • अमंलबजावणीनंतर निवडणुकीलाा सामोर जा, असा सल्ला ठाकरेंनी महायुती सरकारला दिला.

  • 'लाडकी बहीण' योजना तुम्ही आणत असाल, तर 'लाडका भाऊ' ही योजनापण आणा. मुलीप्रमाणे मुलांनाही मदत करा,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com