Ajit Pawar, Devendra Fadnvis Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra : कृषी कर्जाची वसुली होणारच! तब्बल 23 लाख शेतकऱ्यांच्या दारावर धडकणार थकबाकी नोटीस

Ajit Pawar : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले. तसेच 31 मार्चपर्यंत थकीत कर्ज भरा, असे आवाहनही शेतकऱ्यांना केले.

Hrishikesh Nalagune

Farmer News : सगळी सोंगं आणता येतात, पण पैशांचं सोंग आणता येत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले. तसेच 31 मार्चपर्यंत थकीत कर्ज भरा, असे आवाहनही शेतकऱ्यांना केले. आता 31 मार्च संपताच कर्ज वसुलीसाठी आर्थिक संस्थांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 23 लाख शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये राज्यात विधानसभेचा निवडणूक पार पडली. त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातही संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन होते. परिणामी शेतकर्‍यांना मोठी आशा लागली आणि अनेकांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केली नाही.

निवडणूक संपताच सत्तेत आलेले महायुती सरकार निश्चितपणे कर्जमाफी करतील, या आशेने रब्बी हंगामाचेही कर्ज शेतकऱ्यांनी थकविले. पण निवडणूक संपल्यानंतर नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने कर्जमाफीबद्दल कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. आता तर अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नसल्याचेच स्पष्टपणे सांगितले आहे.

सद्य:स्थितीत राज्यातील सुमारे 23 लाख शेतकऱ्यांकडे बँकांची 35 हजार कोटींची थकबाकी असल्याचे 'एसएलबीसी'तील सूत्रांनी सांगितले. 31 मार्च संपताच बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणी सुरू केली जाणार आहे. जुन्या कर्जाची वसुली होत नाही तोपर्यंत नव्या कर्जाचे वाटप करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळविताना अडचणी येऊ शकतात. त्याचवेळी कर्जाची वसुली न झाल्यास या बँकाही अडचणीत येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT