Raj Thackeray : राज ठाकरेंच्या टार्गेटवर मराठा आमदार; म्हणाले, 'आरक्षण मागावं...'

Maratha Reservation Maratha Reservation Speech : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'संतोष देशमुख यांची हत्या झाली. खंडणी मागणारांना विरोध केला म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची जागी कोणी जरी असते तरी त्याची हत्या झाली असती.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील आपल्या जाहीर भाषणातून मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं आहे? असा जाहीर सवाल करत मराठा समाजाचे आमदार, मंत्री यांच्यावर टीका केली.

राज ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर सर्वाधिक आमदार, मंत्री हे मराठा जातीचे होते. तरी मराठा समाजाला आरक्षण का मागवं लागतं? काय केलं या आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी जर माझ्या मराठा समाजाला आरक्षण मागावं लागत असले तर एवढे आमदारा, खासदार का निवडून दिले, असा सवाल देखील ठाकरे यांनी केला.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'संतोष देशमुख यांची हत्या झाली. खंडणी मागणारांना विरोध केला म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची जागी कोणी जरी असते तरी त्याची हत्या झाली असती. पण आपण लेबल काय लावलं मराठ्याला वंजाऱ्यांनी मारलं. यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा तरी काय संबंध? राजकीय पक्ष तुम्हाला जातीपातीत गुंतवत आहेत.'

Raj Thackeray
Prakash Ambedkar :''मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी मशिदीत...'' ; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

औरंगजेबाची कबर हटवू नका

आम्हाला इतिहासावरून भडकवलं जात आहे. ज्यांना औरंगजेबाविषयी माहीत नाही ते विधानसभेत बोलत आहेत. ती सजलेली कबर काढून टाका ती फक्त दिसली पाहिजे. आणि तेथे बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला, असे राज ठाकरे म्हणाले.

'ते' हिंदुत्ववादी मूर्ख

राज ठाकरे म्हणाले, मी कुंभमेळ्यातून गंगेचे आणलेले पाणी पिणार नाही म्हटल्यावर काही हिंदुत्वावाद्यांना वाटले मी कुंभमेळ्याचा अपमान करतोय. मूर्ख आहे ते. गंगेची काय अवस्था झालीये पाहा. गंगेत मृतदेह टाकले जात आहेत, सांडपाणी सोडलं जात आहे. घाटावर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

Raj Thackeray
Raj Thackeray on Aurangzeb tomb: ''ती औरंगजेबाची कबर...''; राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्टच सांगितलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com