Local Body Elections DCM Ajit Pawar And Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Local Body Election : निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याचा अंदाज तंतोतंत बरोबर; आता 'त्या' भविष्यवाणीकडे लक्ष

NCP Dilip Walse Patil Nagarpalika Nagarparishad Election : निवडणूक आयोगाने नगपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक जाहीर होण्याबाबत वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे.

Roshan More

Dilip Walse Patil News : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. तीन डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी एक नोव्हेंबरलाच जाहीर भाषणातून सांगितले होते की, नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका आधी होती आणि बुधवारपासून आचारसंहित लागू होईल.

मंगळवारी (ता.4) निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनी वर्तवलेला अंदाज बरोबर ठरला आहे. दरम्यान, त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूकी बाबत देखील थेट मतदानाची तारीख सांगितली होती. आता ती खरी ठरणार का याकडे देखील लक्ष लागले आहे.

वळसे पाटील म्हणाले होते की, माझ्या माहितीप्रमाणे नगपपरिषद आणि नगपंचायतीच्या निवडणुका सुरू असतानाच जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होईल आणि 15 डिसेंबरला मतदान होईल. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत असतानाच महापालिकेच्या निवडणूक जाहीर होतील आणि जानेवारीमध्ये मतदान होईल. 15 जानेवारीला महापालिकांसाठी मतदान होईल.

नगरपंचायत, नगपरिषद निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 10 नोव्हेंबरपासून उमेदवारांना नगरपंचायत, नगरपरिषद यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर असणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर असणार आहे. मतदान दोन डिसेंबरला तर निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT