Ajit Pawar 1 sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'मी जादूटोणा करतो, ईव्हीएम हॅक करतो तर...ओम भट स्वाहा', अजित पवारांच्या विश्वासू आमदाराने विरोधकांना डिवचले

Local Body Elections Sunil Shelke : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपसोबत मावळमध्ये युती होणार नाही म्हणजे नाही, असे आमदार सुनील शेळके यांनी ठणकावून सांगितले.

Sudesh Mitkar

Pune News : सध्या राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वार जोरदार वाहू लागला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्ष आमने सामने टाकले आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांसह मित्र पक्षातील नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

पुणे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांतून निवडणुकीची रणनीती आखण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील परिस्थिती पाहता महायुतीतील मित्रपक्ष आगामी निवडणुकीत एकमेकांना भिडणार आहेत.

वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. तेथे मार्गदर्शन करताना शेळके म्हणाले, 'पंचायत समितीवर आपल्या पक्षाचा सभापती बसणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार आपलेच निवडून येणार असून नगरपालिका देखील आपलीच होणार आहे. हे सगळं मी सांगितलं आहे आणि ते उद्या खरं होईल तेव्हा आत्तापासूनच विरोधक बोलायला सुरुवात करतील की आमदार ईव्हीएममध्ये गडबड करतो, त्याच्याकडे जादू आहे, तो देवदेव करतो.'

जर मी जादूटोना करत असेल ईव्हीएम हॅक करत असेल तर माझ्या नादाला लागता कशाला, असं म्हणत शेळके यांनी थेट ओम भट स्वाहा म्हणून टाकलं. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

सुनील शेळके यांनी थेट भाजपला आव्हान देत येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपली एकही जागा महायुतीला देणार नाही आणि त्यातली त्यात भाजपला तर नाहीच नाहीचंनाही, असं म्हणत महायुतीतील नव्या वादाला तोंड फोडले आहे.

'युती झाली तर ठीक आहे, नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा आहे. जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास हेच आमचे खरं बळ आहे.', असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला.

एकही जागा देणार नाही...

येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपण महायुती म्हणून जरी असलो तरी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपली एकही जागा महायुतीला देणार नाही. भाजपला तर नाहीच नाही. पंचायत समितीला जर तुम्ही कार्यकर्त्यांनी सांगितलं तर एखाद्या दुसऱ्या जागेचा विचार करू. पण मला तोही निर्णय मान्य नाही कारण पंचायत समितीला सुद्धा आपल्याकडे तेवढेच तुल्यबळ आणि ताकदवान उमेदवार आहेतस असे शेळके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT