Gondia Guardian Minister : राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याने पालकमंत्रीपद सोडले; प्रफुल्ल पटेलांनी झोडपल्यानंतर फेरबदल

Gondia Guardian Minister : प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेनंतर बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया पालकमंत्रीपद सोडले असून, मंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
After Praful Patel’s remarks about absentee Guardian Ministers, Babasaheb Patil relinquishes Gondia charge; Minister Indranil Naik takes over as new Guardian Minister of Gondia district.
After Praful Patel’s remarks about absentee Guardian Ministers, Babasaheb Patil relinquishes Gondia charge; Minister Indranil Naik takes over as new Guardian Minister of Gondia district.Sarkarnama
Published on
Updated on

Gondia Guardian Minister : मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री संजय सावकारे यांच्यापाठोपाठ मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले आहे. आता मंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्यात न येण्याऱ्या पालकमंत्र्यांचे कान टोचले होते. त्यानंतर हा बदल झाला असल्याची चर्चा आहे.

मंगळवारी (14 ऑक्टोबर) वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तब्येतीचे कारण देत बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले आहे. काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे सातत्याने आपल्याला लांबचा प्रवास होत नाही, असे त्यांनी अजित पवार यांना सांगितले होते.

प्रफुल्ल पटेलांनी टोचले होते कान :

काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर पार पडले होते. यात प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या विदर्भातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली होती. तुम्हाला इथं फक्त दोन तासांसाठीच यायचं असेल तर इकडं येऊही नका, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं होतं.

After Praful Patel’s remarks about absentee Guardian Ministers, Babasaheb Patil relinquishes Gondia charge; Minister Indranil Naik takes over as new Guardian Minister of Gondia district.
BJP Politics : सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार ZP अन् पंचायत समितीचे सदस्य; फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

"विदर्भात आमचे अनेक मंत्री येतात, पण मी कोणाविषयी काही विशेष सांगू इच्छित नाही. पण पर्यटनासाठी मेहेरबानी करुन येऊ नये. आमच्याकडं दोन तासांसाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे किंवा तटकरेंकडं जाऊन हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो आणि मी हे करुन आलो याला काहीही अर्थ नाही.

दोन तासांच्या पर्यटनासाठी आमच्याकडं येऊ नये, यायचं असेल तर योग्य रितीनं आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, त्यांना ताकद कशी मिळेल? याच्यासाठी यायचं असेल तर जरुर या. फक्त झेंडा वंदन कार्यक्रमासाठी येऊ नका. पालकमंत्र्यांच्या भूमिकेतच तुम्ही इथं यायला हवं," अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांना चांगलंच सुनावलं होतं.

After Praful Patel’s remarks about absentee Guardian Ministers, Babasaheb Patil relinquishes Gondia charge; Minister Indranil Naik takes over as new Guardian Minister of Gondia district.
Satara ZP Reservation : एकनाथ शिंदेंना जन्मभूमीतच धक्का देण्याची तयारी : 8 वर्षांपूर्वी केलेली चूक सुधारत राष्ट्रवादी लागलीय कामाला

विदर्भात कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री?

वाशिम - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (आधी हसन मुश्रीफ)

बुलडाणा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

गोंदिया - इंद्रनील नाईक (आधी बाबासाहेब पाटील)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com