Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election: याला म्हणतात ठाकरे! आघाडीचं जागावाटपाचं भिजत घोंगडं; तरीही आत्तापर्यंत 21 जणांना उमेदवारी

Shivsena Lok Sabha candidate: आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असतानाच ठाकरेंनी जागा वाटप करणं योग्य नसल्याचंही मित्रपक्ष म्हणत आहेत. त्यामुळे ठाकरेंनी जाहीर केलेल्या या 21 उमेदवारांची उमेदवारी टिकणार की यातील कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडी (MVA) असो वा महायुती (Mahayuti) कोणाचंही जागावाटप पुर्णपणे जाहीर झालं नाही. अद्यापही जागा वाटपाबाबत युती आणि आघाडीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. परंतु, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने मात्र, आघाडीची चर्चा होण्याआधीच आपले एक दोन नव्हे तर तब्बल 21 उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरेंच्या या जागा वाटपावर त्यांच्याच मित्रपक्षांनीच आक्षेप घेतला आहे.

आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असतानाच ठाकरेंनी जागा वाटप करणं योग्य नसल्याचंही मित्रपक्ष म्हणत आहेत. त्यामुळे ठाकरेंनी जाहीर केलेल्या या 21 उमेदवारांची उमेदवारी टिकणार की यातील कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्वाचं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election) कार्यक्रम जाहीर केला, त्यानुसार महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक मागील निवडणुकांपेक्षा अधिक रंगतदार असणार यात शंका नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आत्तापर्यंत आपले 21 उमेदवार जाहीर केले आहेत. तसंच शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटानेही उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेने 21 उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु ठाकरेंच्या यादीतल्या काही उमेदवारांवर त्यांच्याच मित्रपक्षांनी आक्षेप घेतला आहे. आघाडीचं जागावाटप निश्चित झालं नाही. कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला दिला जाणार हे निश्चित नसताना शिवसेनेने (Shivsena) आपले उमेदवार जाहीर कसे केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सांगलीच्या जागेवरुन आघाडीत बिगाडी

शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सांगलीच्या उमेदवाराची घोषणा जाहीर सभेत केल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले. शिवाय काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी तर सांगली काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असून ती जागा आम्हालाच मिळावी अशी मागणी केली. परंतु, कदमांची ही मागणी फेटाळत ठाकरे गट सांगलीची जागा लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आघाडीतील हा वाद मिटायचं नाव घेत नाहीये. अशातच सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेसला (Congress) पंतप्रधान पद गमवायचं आहे का? असा सवालच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विचारला होता. त्यामुळे काहीही केल्या शिवसेना ही जागा सोडणार नसल्याच स्पष्ट झालं आहे. तर सांगलीवरुन काँग्रेस-ठाकरे गटात सुरु झालेला वाद आगाडीतील नेते कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जाहीर केलेले उमेदवार

1)नरेंद्र खेडकर (बुलढाणा), 2) संजय देशमुख (यवतमाळ), 3) संजोग वाघेरे-पाटील (मावळ), 4) चंद्रहार पाटील (सांगली), 5) नागेश आष्टीकर (हिंगोली), 6) चंद्रकांत खैरे (छत्रपती संभाजीनगर), 7) ओमराजे निंबाळकर (धाराशिव), 8) भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), 9) राजाभाई वाजे (नाशिक), 10) अनंत गीते (रायगड)

11) विनायक राऊत (सिंधुदुर्ग, रत्नागिरी), 12) राजन विचारे (ठाणे), 13) संजय दिना पाटील (मुंबई-ईशान्य), 14) अरविंद सावंत (मुंबई-दक्षिण), 15) अमोल किर्तीकर (मुंबई-वायव्य), 16) अनिल देसाई (मुंबई, दक्षिण मध्य), 17) संजय जाधव (परभणी), 18) वैशाली दरेकर (कल्याण), 19)सत्यजीत पाटील (हातकणंगले), 20) करण पवार (जळगाव), 21) भारती कामडी (पालघर). या उमेदवारांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT