manoj jarange patil prakash ambedkar sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : लोकसभेला वंचितबरोबर आघाडी करणार? जरांगे-पाटील म्हणाले...

Manoj Jarange Patil On Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करण्याचा विचार मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे करत आहेत.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election 2024 ) कार्यक्रम मागील आठवड्यात जाहीर झाला आहे. पण, अद्यापही महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं नाही. त्यामुळे 26 तारखेचा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. तसेच, अन्य संघटनांबरोबर चर्चा करणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे. दुसरीकडे मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनीसुद्धा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करण्याबाबत सूचक विधान केलं आहे. त्यामुळे लोकसभेत आंबेडकर आणि जरांगे-पाटील आघाडी करणार का? अशी चर्चा रंगली आहे. यावर जरांगे-पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महाविकास आघाडीनं 4 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिला आहे. पण, रविवारी ( 24 मार्च ) तो प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी नाकारला. 26 मार्चला भूमिका जाहीर करणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं, तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभे करण्याचा निर्णय 30 मार्चला घेऊ, असं जरांगे-पाटलांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर आंबेडकरांशी आघाडी करणार का? या प्रश्नावर जरांगे-पाटलांनी उत्तर दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "30 तारखेला आमचा निर्णय कळवू. राजकारणात काहीही होऊ शकते. निवडणूक लढायची की नाही? उमेदवार द्यायचा की नाही? हे मराठा समाज 30 तारखेपर्यंत कळवेल. त्यानंतर आणखी पत्ते पलटणार आहेत. आताच काही उघड करायचं नाही."

"मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण सरकार देईना. दलित बांधवांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही. हे सगळे समाज एकत्र आले, तर मतदान मोजणाऱ्यांना कंटाळा येईल. पण, सरकारनं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं. आता राजकारणातसुद्धा हलक्यात घेऊन चूक करू नये," असा इशारा देत जरांगे-पाटलांनी पत्ते खुले केले नाहीत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT