Manoj Jarange Patil: प्रशासनाचा नकार, पण न्यायालयाची परवानगी अन् परळीत जरांगेची जंगी सभा; म्हणाले,'गुन्ह्यांचे दायित्व...'

Maratha Reservation News: 'कायद्याचा व आदर्श आचारसंहितेचा मी सन्मान करतो. न्यायालयाच्या नियमांच्या अधीन राहून कार्य करणार, पण कोणाला सुट्टी नाही...'
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Parli News : लोकसभेच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाने मनोज जरांगे यांच्या परळी येथील सभेला परवानगी नाकारली. उलट संयोजकांना नोटीसही दिल्या. पण, समाजबांधव सभा घेण्यावर ठाम राहिले. अखेर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात प्रकरण गेले आणि बुधवारीच सुनावणी होऊन न्यायालयाने सभेला सशर्त परवानगी देण्याचे आदेश दिले. यामुळे ऐनवेळी झालेली सभादेखील जंगीच झाली.

Manoj Jarange Patil
Nilesh Lanke News : आमदार नीलेश लंके नेमके कोणाचे? दोन्ही पवारांच्या वकिलांत खडाजंगी

मग मनोज जरांगे यांनीदेखील तडाखेबंद भाषण करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. गृहमंत्री संपूर्ण राज्यात मराठा समाजावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. बीड जिल्ह्यातही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचे दायित्व पालकमंत्र्यांचे आहेत. त्यांनी लक्ष घालून गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली.

सकल मराठा समाजाच्या वतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हनुमान मंदिरसमोरील मैदानावर महासंवाद बैठकीचे आयोजन बुधवारी (ता.२०) करण्यात आले होते. या बैठकीस तालुक्यासह अंबाजोगाई व इतर ठिकाणाहून मराठा समाज बांधव, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधूनच आरक्षण द्या. ते घेतल्याशिवाय माघार नाही. येथील संवाद बैठकीचे रूपांतर मराठा एकजुटीने जाहीर सभेत केले. याबद्दल परळीकरांचे आभार मानत आपली लढाई चुकीची नाही, समाजाच्या लेकराच्या न्यायाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कायद्याचा व आदर्श आचारसंहितेचा मी सन्मान करतो. न्यायालयाच्या नियमांच्या अधिन राहून कार्य करणार, पण कोणाला सुट्टी नाही. जो कोणी मला विरोध करतो, त्यालाच मी विरोध करतो मला भीती माहिती नाही, सरकारला विनंती, खोटे गुन्हे थांबवा. न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास, राज्यात बैठका का नाही घ्यायच्या, माझी निष्ठा माझ्या समाज बांधवांशी, मी फुटत नाही मॅनेज होत नाही, नियमाच्या अधिन राहून बेमुदत उपोषण करतो तरी शासन गुन्हे दाखल करत आहे, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला.

आरक्षण कसे मिळत नाही तेच बघतो. आपली एकजूट वाया घालायची नाही, शहरातील आमचे बॅनर का काढले, आम्ही आता बैठका घ्यायच्या नाहीत का ? धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव घेता मनोज जरांगे म्हणाले, या अगोदर मी त्यांच्यावर बोललो, पण त्यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. म्हणून काही बोललो नाही. गृहमंत्र्यांनी खोटे गुन्हे दाखल करू नयेत. सर्वांनी 24 मार्चला अंतरवाली सराटीला यावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Manoj Jarange Patil
Lok sabha Election 2024 : 'पुण्यात काँग्रेसने सक्षम उमेदवार न दिल्यास..' ; पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com