Pallwi dempo, kangana ranavat  Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 News: 'या' राज्यात भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवाराला दिले तिकीट

Sachin Waghmare

Lok Sabha News : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशभरातील वातावरण चांगेलच तापले आहे. उमेदवार जाहीर करण्यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपने पाचव्यादा उमदेवारांची यादी जाहीर करीत बाजी मारली आहे. रविवारी रात्री उशिरा 111 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवाराला तिकीट दिले आहे, तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला उमेदवारी दिली आहे.

या वेळेसच्या निवडणुकीत लोकसभेसाठी भाजपने गोव्यातून पहिल्यांदाच महिलेला रिंगणात उतरवले आहे. भाजपने साऊथ गोवा लोकसभा मतदारसंघातून पल्लवी डेम्पो यांना उमेदवार दिली आहे. या मतदारसंघातून भाजप केवळ दोनदा जिंकली आहे. त्यामुळे या पल्लवी डेम्पो अखेर कोण आहेत, याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. (Lok Sabha Election 2024 News)

भाजपने उमेदवारी दिलेल्या पल्लवी डेम्पो एक महिला उद्योजक आहेत. त्या शिक्षण आणि मीडिया क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. सध्या साऊथ गोवा लोकसभेतून कॉंग्रेसचे खासदार फ्रांसिस्को सरदिन्हा आहेत. पल्लवी यांचे पती श्रीनिवास डेम्पोदेखील गोव्याचे लोकप्रिय उद्योजक आहेत. ते गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजचे अध्यक्षदेखील आहेत.

पल्लवी डेम्पो शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्या उद्योग क्षेत्रातील मीडिया आणि रियल इस्टेटदेखील सांभाळत आहेत. पल्लवी डेम्पो या 49 वर्षांच्या आहेत. त्यांनी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. एमआयटी पुणे येथून एमबीए केले आहे. पल्लवी गोव्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभिनेत्री कंगनाला दिली उमेदवारी

भाजपच्या पाचव्या यादीत पिलिभित येथील खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांचे तिकीट यंदा कापले आहे, तर त्यांची आई मेनका गांधी (Menka Gandhi) यांना सुलतानपूर येथून पुन्हा तिकीट दिले आहे. या यादीत अनेक चर्चित चेहरे आहेत. भाजपने प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतला (Kangna Ranavat) हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

R

SCROLL FOR NEXT