BJP Lok Sabha List: वरुण गांधींना डच्चू; चर्चेतील चेहऱ्यांना भाजपची पसंती, अरुण गोविल, नविन जिंदाल, सीता सोरेन...

Lok Sabha election 2024: वरुण यांना उमेदवारी देण्याबाबात अखिलेश यादव सकारात्मक आहेत. पिलिभितची लढाई वरुण यांच्यासाठी इतकी सोपी नाही. अपक्ष उमेदवार म्हणूनही ते निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
BJP Lok Sabha election 2024:
BJP Lok Sabha election 2024:Sarkarnama
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha election 2024) भारतीय जनता पक्षाने पाचवी यादी (BJP Fifth Loksabha List) शनिवारी जाहीर केली. यादीत कंगना रनौत (Kangan Ranaut), अरुण गोविल (Arun Govil), नविन जिंदाल, सीता सोरेन आदी चर्चेतील चेहऱ्यांना भाजपने (BJP) निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. संबलपूरमधून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ओडिशातील पुरीमधून पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना उमेदवारी दिली आहे.

पिलिभित लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. योगी सरकारमध्ये मंत्री जितीन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने वरुण गांधींना डच्चू दिला आहे. त्यामुळे वरुण गांधी यांचे राजकीय भवितव्य काय असेल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

वरुण गांधी हे समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढतील, अशी चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. वरुण यांना उमेदवारी देण्याबाबत अखिलेश यादव सकारात्मक आहे. मात्र, या वेळी पिलिभितची लढाई वरुण यांच्यासाठी इतकी सोपी नाही. अपक्ष उमेदवार म्हणूनही ते निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पिलिभित मतदारसंघात मेनका गांधी सहा वेळा खासदार झाल्या आहेत. 2009 मध्ये त्यांनी वरुण गांधींसाठी पिलिभितची जागा सोडली आणि सुलतानपूरमधून निवडणूक लढवली. त्यानंतर पिलिभितमधून निवडणूक जिंकून वरुण संसदेत पोहोचले. मात्र, 2014 मध्ये पुन्हा एकदा मेनका गांधी पिलिभितमधून विजयी झाल्या आणि संसदेत पोहोचल्या. वरुण गांधी 2019 मध्ये पिलिभितला परतले आणि निवडणूक जिंकले.

BJP Lok Sabha election 2024:
Nashik Lok Sabha 2024: भाजप अन् शिंदे गटात वाद चिघळणार! नाशिकसाठी कुरघोडीचे राजकारण सुरू

आता मेनका गांधींना सुलतानपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर अरुण गोविल यांना मेरठमधून भाजपने मैदानात उतरवलं आहे. सहारनपूरमधून राघव लखनपाल, मुरादाबादमधून सर्वेश सिंह, गाझियाबादमधून अतुल गर्ग, अलिगढमधून सतीश गौतम, हाथरसमधून अनुप वाल्मीकी, बदायूंतून दुर्विजय सिंह शाक्य, बरेलीतून छत्रपाल सिंग गंगवार, कानपूरमधून रमेश अवस्थी, बाराबंकी (एससी) मधून राजराणी रावत, बहराइच (एससी) अरविंद गोंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशातून भाजप सहा जागा लढवणार

आंध्र प्रदेशातून भाजप सहा जागा लढवणार आहे. भाजप-टीडीपी-जेएसपी आघाडीत जागावाटपाचा हा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुरंदेश्वरी यांना राजमुंद्री, कोथापल्ली गीता यांना अराकू, सीएम रमेश यांना अनाकापल्ले आणि माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांना राजमपेट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com