Eknath Shide, Ajit Pawar & Devendra Fadnavis. Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 News: महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या सहा जागांचे उमेदवार ठरले, आग्रह मात्र नऊ जागांसाठी !

Sachin Waghmare

Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग शनिवारी दुपारी करणार आहे. त्यापूर्वीच राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार, याबाबत विविध चर्चा सुरू आहे. त्यातच आता महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला सहा जागा मिळणार असल्याने जवळपास उमेदवार फायनल करण्यात आले आहेत.

राज्यातल्या महायुतीच्या जागावाटपावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यासाठी राज्यातल्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन वेळा भेट झाली. त्यानंतर मुंबईतही जागावाटपावर चर्चा झाली. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम झाली असून, एक दोन दिवसांत ती जाहीर करण्यात येणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. (Lok Sabha Election 2024 News)

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 9 जागांची मागणी केली होती. त्यामध्ये बारामती, शिरूर, रायगड, परभणी, सातारा, धाराशिव या सहा जागा मिळणार असल्याचे समजते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक, गडचिरोली, बुलडाणा या तीन अशा एकूण नऊ जागेची मागणी केली होती.

या सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याने या ठिकाणचे उमेदवार फायनल करण्यात आले आहेत. रायगड : सुनील तटकरे, बारामती : सुनेत्रा पवार, शिरूर : शिवाजीराव आढळराव-पाटील, परभणी : राजेश विटेकर, सातारा : रामराजे निंबाळकर , धाराशिव : सुरेश बिराजदार यांची उमेदवारी जवळपास फायनल असल्याचे समजते. त्याशिवाय नाशिक : समीर भुजबळ अथवा छगन भुजबळ, गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम, बुलडाणा : डॉ. राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी धर्मरावबाबा आत्राम यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, अशी शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीमधील सहा जागांवर चर्चा सुरू

महायुतीमधील (Mahyuti) 42 जागांचा तिढा सुटला आहे. उर्वरित सहा जागांवर चर्चा सुरू आहे. त्यापैकी काही जागा या मनसेला (MNS) देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दक्षिण मुंबई या जागेचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीला मनसेचं बळ मिळाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत अधिक फायदा होण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच मनसेलाही या युतीचा फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

R

SCROLL FOR NEXT