Assembly Election 2024 : ‘या’ पाच राज्यांत वाजणार विधानसभा निवडणुकीचा बिगुल; सध्या कुणाची सत्ता?

Election Commission : निवडणूक आयोगाकडून उद्या लोकसभेसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीचा बिगुल उद्या वाजणार असून, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. त्याचवेळी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2024) कार्यक्रमही आयोगाकडून जाहीर केला जाणार आहे. या चारपैकी एका राज्यात भाजपची सत्ता असून, उर्वरित तीन राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचेच बहुमत आहे. चारही राज्यात काँग्रेसची ताकद अत्यल्प आहे.

देशातील आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही निवडणूक घेतली जाऊ शकते. लोकसभेच्या निवडणुकीसोबतच (Lok Sabha Election 2024) या राज्यांमध्ये विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. काही राज्यांमध्ये उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे.

Election Commission
Lok Sabha Election 2024 : सस्पेन्स संपला; आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार...

आंध्र प्रदेशमध्ये सध्या वायएसआर काँग्रेसची सत्ता आहे. पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. या वेळी त्यांच्याविरोधात बहिणीने शड्डू ठोकला आहे. काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षा वाय. एस. शर्मिला मैदानात उतरल्या आहेत, तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या टीडीपीची भाजपसोबत (BJP) आघाडी होऊ शकते. 2019 च्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला 175 पैकी 151 जागा मिळाल्या होत्या. टीडीपीला 23 तर भाजप व काँग्रेसचा सुपडासाफ झाला होता.

अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) एकूण 60 जागा असून, 2019 मध्ये भाजपने 41 जागा मिळवत सत्ता काबीज केली होती. काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. एनपीपी पक्षाला पाच तर इतरांना दहा जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या तीन आमदारांनी नुकताच पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसची स्थिती दयनीय आहे.

Election Commission
Electoral Bonds Case : सुप्रीम कोर्टाचा SBI ला पुन्हा दणका; पक्षनिहाय मिळालेल्या पैशांचा हिशोब द्या...

सिक्कीममध्ये 2019 च्या निवडणुकीत इतिहास घडला. मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांच्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने 32 पैकी 17 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी पक्षाला धूळ चारली. सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला 15 जागांवर समाधान मानावे लागले होते, तर भाजप आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. भाजप आणि सत्ताधारी पक्षाची आघाडी होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिजू जनता दलाची अनेक वर्षांपासून सत्ता असलेल्या ओडिशामध्येही विधानसभेची निवडणूक होणार आहे. विधानसभेतील 146 जागांपैकी या पक्षाला २०१९ मध्ये तब्बल 112 जागा मिळाल्या होत्या, तर भाजप 23, काँग्रेस 9, सीपीएम 1 अपक्षांना अपक्ष 1 जागा मिळाली होती. बीजेडी आणि भाजपमध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांपासून नाही निवडणूक

जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास दहा वर्षांपासून विधानसभेची निवडणूक घेण्यात आलेली नाही. या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. आता लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेण्याची जोरदार मागणी राजकीय पक्षांकडून होत आहे. निवडणूक आयोगाकडून नुकताच राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे आयोगाकडून उद्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

R

Election Commission
Electoral Bond Update : तपास यंत्रणांच्या कारवायांनंतर 'या' कंपन्यांनी दिल्या राजकीय पक्षांना भरभरून देणग्या!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com