Prakash Ambedkar, Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar On Sanjay Raut : आंबेडकरांनी राऊतांना ठरवलं खोटारडं, 'ती' ऑफरही धुडकावली

Prakash Ambedkar On Bjp : "फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवीतून दिसतं की भाजपची ताकद राहिलेली नाही," असं आंबेडकरांनी म्हटलं.

Akshay Sabale

"प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. लोकसभेसंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे," असं विधान खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलं होतं. यावरून प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांना फटकारलं आहे. "राऊतांनी खोटं बोलणं थांबवलं पाहिजे," असं आंबेडकरांनी सुनावलं. तसेच, "27 मार्चला मी लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार आहे," अशी माहिती आंबेडकरांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले, "महाविकास आघाडीत काही मतदार संघाबाबत मतभेद सुरू आहेत. काँग्रेसनं आपली यादी जाहीर केली. पण, मतभेद असलेल्या मतदार संघातून उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यांच्यातील मतभेद संपल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीबरोबर चर्चा करू. अन्यथा बाकी संघटनांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करू."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"वंचितला तीन जागांची ऑफर"

"राऊतांनी ( Sanjay Raut ) चार जागांची दिलेली ऑफर मी त्यांना परत करतो. ठाकरे गटानं चार जागांवर लढावं. आम्हाला अकोल्यासह दोन जागांची ऑफर देण्यात आली होती. राऊतांनी खोटं बोलणं थांबवलं पाहिजे. 26 मार्चला आमची भूमिका जाहीर करू. मात्र, तिसऱ्या आघाडीबद्दल सध्या भाष्य करू शकत नाही. मी 27 मार्चला अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल करणार आहे," असं आंबेडकरांनी सांगितलं.

"भाजपची लाट संपली"

महायुतीनं महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. याबद्दल विचारल्यावर आंबेडकरांनी म्हटलं, "फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवीतून सिद्ध होतं की भाजपची ताकद राहिलेली नाही. 2014 आणि 2019 ची लाट संपलेली आहे. अन्य पक्षांची ताकद कमी करून निवडणूक जिंकायची, अशी परिस्थिती भाजपनं तयार केली आहे."

"400 पारचा जागा संविधान बदलण्यासाठी"

"1950 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 'आम्हाला संधी मिळाली, तर आम्ही संविधान बदलू' अशी शपथ घेतली होती. त्यामुळे भाजपनं 400 पारचा दिलेला नारा संविधान बदलण्यासाठीच आहे, राज्यशासन करण्यासाठी नाही. 300 जागा असल्या तरी राज्यशासन करता येऊ शकते," असं म्हणत आंबेडकरांनी भाजप आणि संघाला लक्ष्य केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT