Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षासोबत आता वंचित बहुजन आघाडी राहिलेली नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. 'आता जर महाविकास आघाडीसोबत जमलं तर आघाडी आहे, नाही जमलं तर नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. आमची आधी शिवसेनेसोबत आघाडी होती, पण शिवसेनेने महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं, असेही आंबेडकर म्हणाले. (Latest Marathi News)
आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, "नाही आता शिवसेना ठाकरे गटासोबत आमची आघाडी राहिली नाही. महाविकास आघाडीत जायचं असेल तर आपण आधी(शिवसेना-वंचित) बसून बोललं पाहिजे. जागा ठरवल्या पाहिजे, त्यानंतर महाविकास आघाडीत बोलू. या काही गोष्टी फॉलो झाल्या नाहीत. ठाकरेंसोबत आमची आघाडी राहिली नाही. आता महाविकास आघाडीत जमलं तर आमची आघाडी आहे, नाहीतर नाही."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, "शाहू महाराज यांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब आम्ही चळवळीच्या जवळील मानतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते केले जातील."
"10 जागांसंदर्भात शिवसेना ठाकरे गटात वाद आहेत. 5 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद आहेत. महाविकास आघाडीत जागांचा तिढा संपत नाही. त्यामुळे त्यांच्या वादात कुठं जायचं. 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. नंतर आमची भूमिका जाहीर करू," असा इशारा आंबेडकरांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दिला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.