prakash ambedkar shahu maharaj chhatrapati sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar News : शाहू महाराजांबाबत वंचितचा मोठा निर्णय, महाविकास आघाडीला दिला अल्टिमेटम

Prakash Ambedkar On Congress : "काँग्रेसला आम्ही 7 जागांवर पाठिंबा दर्शवला आहे. त्या सात जागा काँग्रेसनं आम्हाला कळवाव्यात," असं आंबेडकरांनी सांगितलं.

Akshay Sabale

काँग्रेसनं शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शाहू महाराज कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी शाहू महाराज यांच्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) शाहू महाराज यांना पाठिंबा देणाचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले, "शाहू महाराज यांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब आम्ही चळवळीच्या जवळील मानतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते केले जातील."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"10 जागांसंदर्भात शिवसेना आणि ठाकरे गटात वाद आहेत. 5 जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद आहेत. महाविकास आघाडीत जागांचा तिढा संपत नाही. त्यामुळे त्यांच्या वादात कुठं जायचं. 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. नंतर आमची भूमिका जाहीर करू," असा इशारा आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला.

"महाविकास आघाडीत तीन पक्षांचं जमलं नाही, तर प्रत्येक पक्षाला 48 जागा लढवाव्या लागतील. तिघे वेगळे लढले, तर काँग्रेसने आम्हाला सात जागा कळवाव्यात. तिथे आम्ही पाठिंबा देऊ," असं आंबेडकरांनी म्हटलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT