Loksabha Election 2024 : केंद्रिय निवडणुक आयोगाने वंचित ला चिन्हं द्यावे यासाठी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज दिल्ली गाठली होती. त्यांनी महिलांचे हक्काचे व लगेच लक्षात राहणारे गॅस सिलेंडर हे चिन्हं क्रमांकावर एकवर मागितले आहे. त्याच बरोबर दूसऱ्या क्रमांकावर ईव्हिएमवर ओळखले जाणारे चिन्हं म्हणून शिट्टी आणि विकासाचे चिन्हं रोड रोलर याची मागणी वंचित ने केली आहे. या तीन पैकी एक चिन्हं वंचित ला मिळणार आहे. या पुर्वी भारिप बमसं असताना काही काळ वंचित नेत्यांनी उगवता सुर्य हे चिन्हं वापरले, त्यानंतर कप बशी चिन्हं वापरले, गेल्या काही निवडणुकीत बंगला, पतंग, गॅस सिलेंडर हेच चिन्हं वंचितचे होते. आज पुन्हा एकदा वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी गॅस सिलेंडर या चिन्हाची मागणी केली आहे.
निवडणुक तोंडावर असताना चिन्हासाठी आंबेडकर यांना दिल्ली गाठावी लागली आहे. यातुन संपुर्ण महाराष्ट्रात आंबेडकर हे वंचित चे उमेदवार उभे करण्याची तयारी तर करत नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. महाविकास आघाडी सोबत त्यांची युती इतिहास जमा झाल्यास वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे संपुर्ण राज्यात 48 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गॅस सिलेंडर, शिट्टी, रोड रोलर या पैकी कोणते चिन्हं वंचित ला मिळेल हे पाहण्यासारखे ठरेल. कारण सामान्य मतदार हा चिन्हं पाहून अनेक वेळा मतदान करत असतो त्यामुळे निवडणुकीत प्रचार, प्रसार आणि मतदारांना प्रभावित करण्यासाठी चिन्हं महत्वाची भूमिका बजावतात. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणुक आयोग चिन्हांचे वाटप राजकीय पक्षांना करते. निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 अंतर्गत ते केले जाते. चिन्हे एकतर राखीव असू शकतात, याचा अर्थ ते एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षासाठी राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील निवडणुकीत किमान मते किंवा जागा मिळवून प्राप्त केलेले असते किंवा चिन्ह 'मुक्त' असतात. नोंदणीकृत पक्षांचे उमेदवारासाठी चिन्हं निश्चित केले जाते. जे पक्ष नव्याने नोंदणीकृत आहेत किंवा राज्य पक्ष होण्यासाठी विहित निकष पूर्ण करण्यासाठी विधानसभा किंवा सार्वत्रिक निवडणुकीत मतांची पुरेशी टक्केवारी मिळवलेली नाही. अशा पक्षांद्वारे निवडल्यानंतर, त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये, इतरांना निवडण्यासाठी ही चिन्हे पुन्हा मुक्त घोषित केली जातात. देशात सहा राष्ट्रीय पक्ष, 26 राज्य पक्ष आणि 2,600 नोंदणीकृत विविध पक्ष आहेत.
सामान्य माणुस सहज ओळखू शकतील अशा दैनंदिन वस्तूंचा विचार करत चिन्हं निश्चित केले जातात. नव्या चिन्हांमध्ये नूडल्सची वाटी, मोबाईल चार्जर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. एखाद्या पक्षाची इच्छा असल्यास, त्यांच्या उमेदवारांना वाटप करण्यासाठी, त्यांच्या पसंतीच्या तीन नवीन चिन्हे, नावे आणि स्पष्ट रचना आणि चिन्हांची रेखाचित्रे, पसंतीक्रमानुसार, प्रस्तावित करू शकतात. आयोगाने वाटपासाठी उमेदवारांचे समान चिन्ह म्हणून विचार करता येतो. पक्षांनी प्रस्तावित केलेल्या चिन्हांमध्ये सध्याच्या आरक्षित चिन्हांशी किंवा मुक्त चिन्हांशी किंवा कोणत्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक अर्थाशी साधर्म्य नसावे किंवा कोणत्याही पक्षी किंवा प्राण्यांचे चित्रण नसावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीला कोणते चिन्हं केंद्रिय निवडणुक आयोग देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत तीन चिन्हांची मागणी केली आहे. दोन दिवसात हे चिन्हं निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.