raj thackeray eknath shinde sarkarnama
महाराष्ट्र

Mns Vs Shinde Shivsena : मनसेला लोकसभेच्या जागा देण्यास शिंदे गटातूनच विरोध?

Raj Thackeray Latest News : मनसेकडून शिवसेना शिंदे गटाच्या जागांवर दावा केल्यानं पक्षात अस्वस्थता पसरली आहे.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) मनसेची भाजपबरोबर युती होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. महायुतीत समावेशानंतर मनसेला राज्यात दोन जागा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसेला जागावाटपात हव्या असलेल्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. पण, मनसेला जागा देण्यास शिंदे गटानं तीव्र विरोध दर्शवला आहे.

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं जाताच मनसेचा महायुतीचा समावेश करण्यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्ली येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांची भेट घेतली. कोणत्याही क्षणी राज ठाकरे महायुतीत समील होतील, असं चित्र आहे. पण, मनसेनं महायुतीच्या जागावाटपामध्ये दक्षिण मुंबई, कल्याण आणि शिर्डी अशा तीन मतदारसंघांवर दावा केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता परसली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांचा मतदारसंघ आहे. श्रीकांत शिंदे कल्याणमधून प्रचाराला सुरुवातही केली आहे. दक्षिण मुंबई हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. येथून ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटते. भाजपनंही या जागेवर दावा ठोकला आहे. पण, मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्यासाठी राज ठाकरे स्वत: प्रयत्नशील आहेत.

त्याशिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे खासदार आहेत. ते सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असून, त्यांच्याविरोधात पोषक वातावरण नसल्यानं उमेदवार बदलून ही जागा भाजपनं लढवावी, अशी मागणी होत आहे. मात्र, शिर्डीवरही मनसेनं दावा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत अवस्थता पसरली आहे. जागावाटपात मनसेला एकही जागा सोडू नये, अशी भूमिका शिंदे गटानं घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करावा. तसेच, विधान परिषद किंवा राज्यसभेच्या जागांचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवावा, असा सूर महायुतीत आणि शिंदेंच्या शिवसेनेत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मनसेला जागा देण्यास शिंदे गटातूनच थेट विरोध होत असल्याची चर्चा आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT