Shrikant Shinde : "CM शिंदेंनी माझ्याविरोधात लढावे", ठाकरेंच्या आव्हानावर श्रीकांत शिंदे म्हणाले, "आपली..."

Shrikant Shinde On Eknath Shinde : "मुख्यमंत्री शिंदे हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते. त्यांनी..."
Shrikant Shinde eknath shinde aaditya thackeray
Shrikant Shinde eknath shinde aaditya thackeraysarkarnama
Published on
Updated on

काही दिवसांपूर्वी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) ठाण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी "इलका हमारा, और धमका ही हमारा होगा" असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं होतं. तसेच, "राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात ठाण्यातून निवडणूक लढा," असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. आता आदित्य ठाकरेंना खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ( Shrikant Shinde Reply Aaditya Thackeray Latest News )

Shrikant Shinde eknath shinde aaditya thackeray
Imtiaz Jaleel : "...तर मी अमरावतीतून निवडणूक लढण्यास तयार," जलीलांचं राणांना प्रत्युत्तर

शनिवारी ( 24 फेब्रुवारी ) ठाण्यातील युवा सेनेच्या युवा महोत्सवामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रकट मुलाखत गायक अवधुत गुप्ते यांनी घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीकांत शिंदे म्हणाले, "आव्हान कोण देतं आणि त्याला प्रतिसाद काय द्यायचा आपण ठरवायला हवं. हत्तीनं आपली चाल चालत राहावी. मागे कोण काय बोलतं, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपली योग्यता काय? आपला संबंध काय? आपण बोलतो काय? मुख्यमंत्री शिंदे हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते. त्यांनी कष्टानं हे उभारलं आहे. त्यामुळे आव्हान देण्याची गरज नाही."

Shrikant Shinde eknath shinde aaditya thackeray
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडावरून फुंकली 'तुतारी', म्हणाले, "महाराष्ट्राची स्थिती बदलून..."

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं होतं?

"ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला नाही, तर 'इलका हमारा, और धमका ही हमारा होगा'," असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

Shrikant Shinde eknath shinde aaditya thackeray
Amol Mitkari : आव्हाडांना देण्यासाठी 1 लाखाच्या चेकवर मिटकरींनी केली सही; पण घातली 'ही' अट

"एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात निवडणूक लढवावी, हा कोणाचा बालेकिल्ला नाही. एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य अपयशी मुख्यमंत्री आहेत. 20 मे 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे वर्षावर येऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडले आणि भाजप मला तुरूंगात टाकेल, असं सांगितलं," असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं होतं.

Shrikant Shinde eknath shinde aaditya thackeray
Kolhapur News : जयंतराव पाटलांचा वेगळा डाव? प्रतीक पाटलांच्या चर्चेमुळे शेट्टी-मानेना धसका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com