Sudhir Mungantiwar on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर पवारांच्या वक्तव्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत (Congress) येतील, त्यातील काही पक्ष विलीन होऊ शकतात, असं मोठं विधान पवारांनी केलं. त्यांच्या या विधावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.
मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, शरद पवारांचं (Sharad Pawar) लोक माझे संगती हे आत्मचरित्र वाचलं तर त्याचं राजकारण तडजोडीचं आणि सत्तेच्या स्वार्थाचं राजकारण राहिलेलं आहे हे दिसून येतं. सोनिया गांधींवर (Sonia Gandhi) टिप्पणी करताना त्यांनी 15 मे 1999 रोजी विदेशी मुळाचा मुद्दे घेत टीका केली होती. त्यांनतर त्यांनी वेगळा पक्ष काढला. आणखी काही महिन्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, सोनिया गांधी पवारांवर विश्वास ठेवत नव्हत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवाय आज पवारांना हे म्हणायची गरज का लागली? कारण त्यांना राष्ट्रवादीच्या (NCP) भवितव्याची कल्पना आहे. राष्ट्रवादीचा आधार असलेले अजितदादा आज त्यांच्यासोबत नाहीत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांनी अजितदादांना खूप दुखावलं, प्रचाराचा स्तर खाली गेला, म्हणून अजितदादा परत जाणार नाहीत.
आताची शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, शिवसैनिकांची नाही. आताची राष्ट्रवादी पवारांच्या नावाने आहे. इतिहासात कधीही नावाने पक्ष नव्हते, हे पक्ष नावाचे झालेत कार्यकर्त्यांचे राहिले नाहीत, असा हल्लाबोल मुनगंटीवार यांनी ठाकरे आणि पवारांवर केला.
आता प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील असं म्हणावं लागलं. राजकारणात समविचारी पक्ष असले तरी त्यांचं विलीनीकरण होत नाही. आज जो विलिनीकरणचा विषय आलाय, तो भवितव्याच्या अनुषंगाने आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, 'या निवडणुकीनंतर राज्यातील 2 पक्ष संपतील,' त्यांच्या या वक्तव्याचा पवारांच्या विधानाशी संदर्भ असल्याचा दावाही मुनगंटीवारांनी केला.
तसंच आम्हाला 2014 ला बहुमत नव्हतं, तेव्हा यांनी न मागता पाठिंबा दिला. भाजपसोबत जाण्याचा निर्णय तेव्हा कुणी घेतला होता. लोक माझे सांगाती मधून पवारांचं राजकारण काय आहे ते समजतं. पवारांनी आपल्या भावाचा पराभव केला होता, आज एक भाऊ आपल्या बहिणीचा पराभव करेल असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.