Unmesh Patil News : जळगाव लोकसभा मतदारसंघाचा प्रचार चांगलाच रंगला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी राजकारण चांगलेच तापले आहे. गिरीश महाजन यांना पहिल्यांदाच जोरदार आव्हान देण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला आहे.
महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील (Karan Patil) यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल जळगाव येथे सभा झाली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. महायुतीचे उमेदवार आणि नेते सावध झाले आहेत.
यावेळी भारतीय जनता पक्षातून नुकतेच शिवसेना ठाकरे गटात (ShivsenaUBT) प्रवेश केलेल्या खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले.उन्मेष पाटील (Unmesh Patil) म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील आणि मुख्यमंत्री यांच्या सर्वात जवळचे असा दावा करणारे मंत्री जिल्ह्यासाठी काहीही करू शकले नाहीत.
जळगावचे कोणते प्रश्न त्यांनी सोडवले हे सांगावे. जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे झोपा काढत असतील, तर अशा नेत्यांचा जळगावला काहीही उपयोग नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याचे चोख उत्तर मतदार दिल्याशिवाय राहणार नाहीत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गिरीश महाजन (Girish Mahajan) हे संकटमोचक नसून जळगाव जिल्ह्यावरील संकट आहे. या शब्दात खासदार पाटील यांनी गिरीश महाजन यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महाजन हे डुप्लिकेट संकट मोचक आहेत. गेल्या वर्षी कांद्याचा प्रश्न निर्माण झाला.
त्यावेळी ते चांदवडला गेले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन यावर तोडगा काढतो, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र निष्पन्न काय झाले? गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी मिळाली. गुजरातच्या कांद्याचे शेतकरी आहेत. जळगाव आणि महाराष्ट्रातले कांदा उत्पादक शेतकरी कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.
भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे ते नंबर एक आहे. नंबर दोनच्या पैशांचा जोरदार व्यवहार करतात. मतदारसंघामध्ये एका एका गटात पाचशे किलोचे मटण देण्यात येत आहे. नंबर दोनच्या पैशांचे जोरदार वाटप होणार आहे. कार्यकर्ते रोज याबाबत आम्हाला सांगत आहेत.
कार्यकर्त्यांचा एकच सूर आहे, "कोणाचेही खाऊ मटन, पण आम्ही दाबू मशालीचेच बटन" त्यामुळे येत्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना नोकर समजणाऱ्या भाजप आणि संकट मोचक या दोघांचाही हिशेब पूर्ण करण्यात येईल, असा इशारा खासदार पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.