Lok Sabha Election News Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha News : पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या; 13 मतदारसंघात चुरशीच्या लढती,धाकधूक वाढली

Sachin Waghmare

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा १६ मार्चला झाली. त्यानंतर राज्यात जवळपास प्रचाराची रणधुमाळी जॊरात सुरु होती. उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. प्रचार सभा, रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा, प्रत्यक्षात मतदाराची भेट घेत कुठलीच कसर ठेवण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास थंडावल्या.

मुंबईतील 6 लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात राज्यात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. एकमेकांवर करण्यात आलेल्या टीका व टिपणीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. शनिवारी सायंकाळी पाचव्या टप्प्यातील प्रचार थांबला आहे. (Lok Sabha Election News )

पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महायुतीकडून (Mahayuti) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रचार सभांचा धडाका लावण्यात आला होता. आतापर्यंत मोदींनी राज्यात जवळपास 19 सभा घेतल्या आहेत. तर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit shah) यांनी ही सभा घेतल्या.

भाजपकडून महाविकास आघाडीच्या (MVA)विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले.तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, नाना पाटोले यांनी प्रचाराची धुरा संभाळली. या सर्व सभा व प्रचार सभा, रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा, प्रत्यक्षात मतदाराची भेट घेत सर्वच पक्षांनी मेहनत घेतली.

या 13 जागांसाठी होणार मतदान

मुंबईतील 6 जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात 20 मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना वि. शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे चार उमेदवार

मुंबईत काँग्रेस पक्षाकडून 2 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित 4 जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोनहात करणार आहेत. महायुतीमध्ये 3 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशी लढत रंगणार

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव

दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई

उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील

उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड

उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील

वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर

कल्याण-डोंबवली : वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे

ठाणे : राजन विचारे विरुद्ध म्हस्के

पालघर :भारती कामडी विरुद्ध डॉ. हेमंत सावरा

भिवंडी : सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील

नाशिक : राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे

दिंडोरी : भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार

वर्धा : शोभा बच्छाव विरुद्ध सुभाष भामरे

SCROLL FOR NEXT